बिलोली नगर परिषदेस १० कचरा कुंड्या भेट

0
34
बिलोली (सय्यद रियाज),दि.10ः- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत येथील अल ईम्रान प्रतिष्ठान व बाईट्स कम्प्युटर बिलोलीच्या वतीने आज (दि.१५)१० कचरा कुंड्या बिलोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ.मैथिली संतोष कुलकर्णी व मुख्याधिकारी डॉ.ओमप्रकाश गोंड यांच्या प्रमुख उपस्थितीत  स्वाधीन करण्यात आल्या.स्वच्छ सर्वेक्षण मिशन-२०१८ एक कदम स्वच्छता की और अंतर्गत सुका कचरा टाकण्यासाठी उपयोगी पडणारा १० कचरा कुंड्या अल ईम्रान प्रतिष्ठान व बाईट्स कम्प्युटर च्या वतीने नगर परिषद बिलोली यांना देण्यात आले. यावेळी न.पा चे उपाध्यक्ष मारोती पटाईत,माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, जावेद सेठ, नगरसेवक शाहेद इनामदार,जावीद कुरेशी, लक्ष्मण शेट्टिवार,अरूण उप्पलवार,अल इम्रान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.मोहसिन खान,बाइटर्स कंप्युटर्सचे संचालक मिर्झा जावेद बेग, नगरसेवक प्रतिनिधी उत्तम जेठे यांच्या सह संग्राम चव्हाण, रघुनाथ जोंधळे, नारायण मेघमाळे,कमल तुडमे, सखाराम गायकवाड, अभियंता नागनाथ देशमुख,दत्तराव शिंदे,गुलाम यसदानी,अकबर खान, चव्हाण,प्रदिप डिल्लोड नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.