आज नांदेडहुन बहुसंख्य शिवप्रेमी बांधव जाणार-भागवत देवसरकर

0
43
दिल्ली येथिल शिवजंयती सोहळा राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या उपस्थितीत साजरा होणार.
 नांदेड,दि.17ः-संपुर्ण देशाचे अक्षय उर्जास्थान,स्फुर्तिस्थान बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 388 वी जयंतीनिमित्त खा.संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली व अ.भा.शिवराज्यभिषेक महोत्सव समिती च्या वतिने दिल्ली येथिल आयोजित शिवजंयती सोहळ्यास देशाचे राष्ट्रपती रामनाथजी कोविंद उपश्थित राहणार अाहेत.या सोहळ्यास नांदेडहुन शेकडो शिवप्रेमी बांधव जाणार असल्याची माहीती अ.भा.शिवराज्यभिषेक महोत्सव समिती सदस्य भागवत देवसरकर यांनी दिली आहे.
19 व 20 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे पार पडणारा महाराष्ट्र सदनातील शिवजन्मोत्सव सोहळा, राजपथावरील शोभायात्रा, सांस्कृतिक व मर्दानी खेळ व शिवचरित्रावरील महानाट्य संपूर्ण देशाचे लक्ष निश्चितच वेधून घेईल.सोहळ्यास देशातील हजारो शिवभक्तांसहीत देशाच्या सेनादलांचे सर्वोच्च प्रमुख महामहिम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, नौसेना प्रमुख अँडमिरल सुनील लांबा व जनरल पंनू तसेच कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
 शिवरायांनी प्रभावी लष्कर व आरमार स्थापन करुन आदर्श युद्धनिती घालून दिली.शिवरायांचा देशाच्या राजधानीत साजरा होत असलेल्या जन्मोत्सवास देशाचे सर्वोच्च सेनाप्रमुख असलेले राष्ट्रपती महोदय, स्थलसेना प्रमुख व नौसेना प्रमुख उपस्थिती लावत आहेत, हे प्रथमच घडून येत आहे. दिल्ली येथिल शिवजंयती सोहळ्यास उपश्थित राहण्यासाठी नांदेड हुन शेकडो शिवप्रेमी बांधव आज शनिवार 17 फेब्रुवारी रोजी संचखड एक्सप्रेस ने दिल्ली ला रवाना होणार असल्याची माहीती अ.भा.शिवराज्यभिषेक महोत्सव समिती चे सदस्य भागवत देवसरकर यांनी दिली आहे.