क्रांतीगुरु लहुजी साळवे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

0
28

बिलोली दि.१७ः:- ”जगेन तर देशासाठी मरेन तर देशासाठी”अशी सिंह गर्जना करणारे थोर देशभक्त आद्यक्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या १३८ पुण्यतिथी निमित्य आज(दि.१७) तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोणार (ता.कंधार जि.नांदेड)च्या वतीने बिलोली शहरातील देशमुखनगर मैदानात अभिवादन करण्यात आले.ज्येष्ठ पत्रकार तथा फुले आंबेडकरी नेते संजयकुमार बिलोलीकर यांच्या हस्ते उस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यांनी लहुजी साळवे यांनी केलेल्या कार्यावर विशेष प्रकाश टाकत लहुजी यांच्या कार्याची माहीती उपस्थितांना दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार सय्यद रियाज होते.प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार मार्तंड जेठे होते.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ.चित्रा सुर्यवंशी,सचिव डी.टी,सुर्यवंशी उपस्थित होते.संचालन कुलदिप सुर्यवंशी गोणारकर यांनी केले तर आभार केशव रानवळकर यांनी मानले. यावेळी कदम,शिवाजी गायकवाड,शुभम निदाने,कुणाल सुर्यवंशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.