शिवप्रेमी मुस्लिम हे महाराष्ट्र धर्माचे पहारेकरी- अनुप अंकुशकर

0
13
बिलोली(नांदेड),दि.19 :-  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अल इम्रान प्रतिष्ठान बिलोलीच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर आयोजित व्याख्यानमाला कार्यक्रमाप्रसंगी  शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार  अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.प्रमुख वक्ते प्रा.नितीन दारमोड, कृतिका गाडीवान व मादी नगराध्यक्ष अनुप अंकुशकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अंकुशवार यांनी जे मुस्लिम हे शिवाजी महाराज विरोधी असल्याचे प्रचार करुन समाजात व्देष पसरविण्याचे काम करतात अशा विकृत मनोवृत्तीच्या विचारधारेपासून सावध राहण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.सोबतच शिवाजी महाराजांचे प्रेमी शिवप्रेमी मुस्लीम हे धर्माचे पहारेकरी असल्याचे विचार व्यक्त केले.मुस्लिम समाजाद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवचरित्र एक प्रेरणा  विषयावर आयोजित व्याख्यानमाला हे शिवजागर करण्याचा अभिनव उपक्रम असल्याचेही म्हणाले. कृतिका गाडीवान या बालिकेने महिलांचा सन्मान करण्याची प्रेरणा शिवाजी राज्यांच्या चरित्रातून घ्यावी असे आवाहन केले.याप्रसंगी माजी न.प. अध्यक्ष संतोष कुलकर्णी ,भीमराव जेठे ,विद्यमान उपाध्यक्ष मारोती पटाईत, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, माजी उपाध्यक्ष शंकर मावलगे, आनंद बिरादार उमाकांत गोपछडे,,  अभिजित तुडमे, इंद्रजित तुडमे, नगरसेवक लक्ष्मण शेट्टीवार, गंगाधर पुप्पलवार, धम्मदीप गावंडे, अल्पसंख्याक चे शेख सुलेमान, साजीद कुरेशी, पत्रकार अशोक दगडे,सय्यद रियाज,दिलीप घाटे, सुनिल कदम, दादाराव इंगळे, पंढरीनाथ गायकवाड, माधव एडके, सुनिल कदम, शिवराज रायलवाड, शे‌. फारूख,राजू शिंदे पाटील,सनिल जेठे सह प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रा.गोविद चौधरी यांनी केले.