सुकमा चकमकीत २0 नक्षल्यांचा खात्मा

0
6
file photo

रायपूर(वृत्तसंस्था),दि.20ः- छत्तीसगडमधील सुकमा जिल्हय़ात सुरक्षा रक्षक व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच तासात २0 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. नक्षलविरोधी अभियानाचे विशेष महानिरीक्षक डी. एम. अवस्थी यांनी सोमवारी ही माहिती दिली.
रविवारी पाच तास ही चकमक सुरू होती. यावेळी सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून अनेक जवान जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. सुकमातील चिंतागुफा येथे रस्तानिर्मितीचे काम सुरू असून यास नक्षलवाद्यांचा विरोध आहे. रविवारी दुपारी जवान रस्तेनिर्मितीच्या कामात व्यस्त असताना नक्षलवाद्यांनी अचानक जवानांवर हल्ला केला. यावेळी नक्षलवाद्यांनी रस्तेनिर्मितीसाठी वापरण्यात येणार्‍या दहा वाहनांच्या टाक्या फो.डल्या व वाहन पेटवून दिली. जवानांवर हल्ला करण्याआधी नक्षलवाद्यांनी रस्तेनिर्मितीचे काम करणार्‍या कंत्राटदाराची व एका मजुराची हत्या केली. तसेच तीन मजुरांचे अपहरणही करण्यात आले. रस्तेनिर्मिती कामास नक्षलवाद्यांचा सुरुवातीपासूनच विरोध असून हे काम बंद करण्याची नक्षलवाद्यांनी धमकी दिली आहे. मात्र, जवानांनी काम सुरुच ठेवल्याने नक्षलवादी अधिक आक्रमक झाले आहेत.
याआधी रस्तेनिर्मिती करताना झालेले नक्षलवादी हल्ले
२४ एप्रिल २0१७ बुरकापालजवळ रस्तेनिर्माण काम करत असताना जवानांवर हल्ला. २५ जवान शहीद. ११ मार्च २0१७ भेज्जीजवळ पूलनिर्मिती काम करत असताना नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात १२ जवान शहीद. १२ एप्रिल २0१५. पिडमेल गावाजवळ विशेष कृती दलावरील नक्षलवाद्याच्या हल्ल्यात ७६ शहीद. ६ एप्रिल २0१0 ताडमेटला येथे सीआरपीएफ जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ७६ जवान शहीद झाले होते.