अमोल मिटकरी यांचे व्याख्यान : उद्या लिंगापूर येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त

0
102

संयोजक भागवत देवसरकर यांची माहिती
नांदेड,दि.२१ः – कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 388 व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त लिंगापूर ता. हदगाव येथे भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन उद्या शुक्रवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता लोकडोबा मंदिराच्या प्रांगणात आयोजित केली असल्याची माहिती सोहळ्याचे संयोजक तथा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे.
शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून महाराष्ट्रातील धगधगती तोफ, प्रसिद्ध विचारवंत अमोल मिटकरी राहणार आहेत. यावेळी समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या निवृत्त जिल्हा न्यायाधीश के.आर. देवसरकर, भगवती हॉस्पिटलचे संचालक डॉ. अंकुश देवसरकर, ख्यातनाम वकील ऍड. बालाजी शिरफुले, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर यांचा कार्यगौरव करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्याचे उद्‌घाटन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार करणार असून विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील, अधीक्षक अभियंता (बां) संतोष शेलार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, उपविभागीय अधिकारी महेश वडदकर, आत्म्याचे प्रकल्प संचालक डॉ. विजय भरगंडे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेश धुर्वे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई पाटील, मराठा सेवा संघाचे सोपानराव क्षीरसागर, नानाराव कल्याणकर, कृषी परिषदेचे चक्रधर पाटील, विनीत पाटील, राम कदम, परमेश्वर काळे, संजय कदम, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम, तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, उपविभागीय अभियंता (जि.प.) पी.एस. मुंढे, ता. कृषी अधिकारी बालाजी मुंढे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
परिसरातील शिवप्रेमी बांधवांनी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजक भागवत देवसरकर, शिवजन्मोत्सव सोहळ्याचे पदाधिकारी संतोष देवसरकर, दत्तराव देवसरकर, संतोष देवसरकर, शिवाजी देवसरकर, ज्ञानेश्वर देवसरकर, विद्याधर देवसरकर, गजानन देवसरकर, गणेश देवसरकर, संदीप देवसरकर, विशाल देवसरकर, अविनाश देवसरकर, नरेश देवसरकर, बापुराव देवसरकर, यज्ञवलकी देवसरकर आदींनी केले आहे.