ओप्पो ए ७१ स्मार्टफोनची नवीन आवृत्ती

0
16

ओप्पो कंपनीने आपल्या ए ७१ या मॉडेलची नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारली असून यातील कॅमेर्‍यात कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारी ब्युटी रेकग्नीशन प्रणाली देण्यात आली आहे.ओप्पो कंपनीने आधीच भारतीय ग्राहकांसाठी ए ७१ हे मॉडेल सादर केले आहे. याला आता ओप्पो ए ७१ (२०१८) या नावाने काही नवीन फिचर्सचा समावेश करून लाँच करण्यात आले आहे. वर नमूद केल्यानुसार यात ब्युटी रेकग्नीशन या नवीन फिचरचा समावेश करण्यात आला आहे. यात आर्टीफिशियल इंटिलेजियन्स तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वात चांगल्या प्रतिमेची निवड करता येत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात एफ/२.२ अपार्चर तसेच एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा दिलेला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एफ/२.४ अपार्चरयुक्त ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल.

उर्वरित फिचर्सचा विचार करता, ओप्पो ए७१ (२०१८) या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा (१२८० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा डिस्प्ले असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण प्रदान करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर आहे. या मॉडेलची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६  जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यात ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.  ओप्पो ए७१ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या कलर ओएस ३.२ वर चालणार आहे.  ओप्पो ए७१ (२०१८) मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, ओटीजी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. ग्राहकांना हे मॉडेल ९,९९० रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे.