मोहरणा जि.प.क्षेत्रात विविध विकास कामांचे भूमिपूजन.

0
8

लाखांदुर,दि.२२:-तालुक्यातील चौरास भाग म्हणुन प्रसिध्द असलेल्या जि.प.क्षेत्र मोहरणा येथील गावांचा हवा तेवढा विकास झाला नसल्याने रस्ते, गटारे यासारखे कामे कित्येक दिवसापासून खोळंबली होती. माञ जि.प.सदस्या प्रणालीताई पी.ठाकरे सततच्या पाठपुरावामुळे कामांना मंजूरी मिळाली असून  आज (दि.२२) क्षेत्रातील टेंभरी व खैरी/पट येथे विविध विकास कामाचे त्यांनी भुमिपुजन केले आहे. त्यात ग्रामपंचायत कार्यालय विहीरगाव येथील टेंभरी (वार्ड क्र.१) येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिमेंट कॉंक्रेट रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय खैरी/पट येथे विशेष रस्ता दुरूस्ती कार्यक्रमाअंतर्गत वार्ड क्र.१ मध्ये १ कि.मी. खळीकरण रस्ता, वार्ड क्र.३ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिमेंट कॉंक्रेट रस्त्याचे भुमिपुजन करण्यात आले आहे.दरम्यान ठाकरे म्हणाल्या की, मागिल दोन वर्षांत मोहरणा जि.प.क्षेत्रातील अर्ध्याहुन अधिक कामे पुर्ण झाली असून, उर्वरीत असलेली कामे लवकरच पुर्ण करून मतदारांच्या ऋणाची परतफेड करणार आहोत.यावेळी पं.स.उपसभापती शिवाजी देशकर, भाजपा तालुकाध्यक्ष नुतन कांबळे, ग्रा.पं.सरपंच होमराज ठाकरे विहीरगाव, सरपंच सौ.मंगलाताई शेंडे खैरी/पट, सरपंच राहुल मेश्राम गवराळा, उपसरपंच मनोज मेश्राम विहीरगाव, उपसरपंच वामन नखाते खैरी/पट,  ग्रामसेवक एम.एन.लांजेवार, ग्रा.पं.सदस्य नरेश अलोने, ग्रा.पं.सदस्या शर्मिलाताई हुमने, जिवन पिलारे, छगन दिघोरे, नरेश मांढरे, दिनकर ठाकरे, शिवदास कांबळे, जगदिश तिघरे, जितेंद्र ढोरे, जितेंद्र अलोने, अनिल बगमारे, ग्रा.रो.सेवक हिरालाल दोनाडकर, विनायक हुमने, दिपचंद सोनवाने व आदी उपस्थित होते.