माजी खासदार पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी

0
6

गोंदिया,दि.22- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार नाना पटोले यांनी भाजप सोडून काँग्रेस प्रवेश केल्याच्या दीड दोन महिन्यानंतर अखेर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी यांनी पटोले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याची घोषणा काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन व्दिवेदी यांनी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.पटोले हे भाजप मध्ये असतानाही प्रदेश उपाध्यक्ष होते.आता काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष झाल्याने विदर्भात त्यांचे वजन वाढले असून गोंदिया भंडारा जिल्ह्यात त्यांच्या शब्दाला वजन राहणार आहे.पटोले यांच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याने गोंदिया जिल्हा परिषदतेली भाजप युतीवर नक्कीच काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.