शिल्पकार माधव प्रल्हाद कांबळे सन्मानित

0
17
 बिलोली-( सय्यद  रियाज ),दि.22ः- लोहगाव येथील चित्र शिल्पकार तथा कलाशिक्षक (जि.प.हायस्कूल लोहगांव) यांच्या कलाकृती सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवात ठेवण्यात आलेल्या प्रदर्शनात होट्टल  मंदिरावरील चालुक्यकालीन श्रंगार रसात मग्न असलेल्या शिल्पाची प्रतिकृतीला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.त्यांच्या या प्रतिकृतीबद्दल माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण,आमदार सुभाष  साबणे, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व अप्पर जिल्हाधिकारी  संतोष पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. माधव प्रल्हाद कांबळे व्यावसायिक चित्रकार व शिल्पकार म्हणून नांदेड, हिंगोली, लातूर, निजामबाद या परिसरात murals(भिंतीशिल्प) Sculpture (शिल्पकला) कॅनवास पेंटिंग चे काम करतात. मिळालेल्या सन्मानाबद्दल प्रकाश वसमते  (माजी. अधीक्षक अभियंता)   दत्तगीर गोस्वामी( माजी. सरपंच) दत्ता पांढरे (माजी. सरपंच) दिलीप पांढरे,प्रल्हाद वानोळे, मुख्याध्यापक दिगांबर गीरी,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष स्वामी व अनिल गोस्वामी इतर मान्यवर गावकरी यांनी अभिनंदन केले.