बिलोली येथे शिवसेनेची बैठक संपन्न

0
12
बिलोली(नांदेड),दि.23ः- शिवसेनेच्या शिवंसर्पक अभियानांतर्गत  देगलुर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकार्यांची बैठक बिलोली येथील आमदार सुभाषराव साबने यांच्या शिवनेरी जनसंपर्क कार्यालयात पार पडली.यावेळी पक्षनिरीक्षक तथा संभाजीनगरचे माजी महापौर त्र्यंबक तुपे,उपजिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील समन, बिलोलीचे तालुकाप्रमुख बाबाराव पाटील रोकडे, देगलुरचे तालुकाप्रमुख महेश पाटील, युवासेना जिल्हायुवाधिकारी विक्रम साबने,विधानसभा संघटक अवधूत भारती, तालुका संघटक शंकर मावलगे, बिलोली शहरप्रमुख अशोक तुडमे, कुंडलवाडी शहरप्रमूख गंगाप्रसाद गंगोने, व्यंकट पुरमवार, महादेव माका, जेजेराव पाटील, व्यंकट गुजरवाड, रमेश देसाई बाभलीकर, शैलेश ऱ्याकावार, अभिजीत धरमुरे, सुभाष कापावर  यांच्यासह आदि उपस्थित होते.