आमगाव येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

0
5
आमगाव,(पराग कटरे)दि.२३ःयेथील  जय श्रीराम क्रिकेट परिवार आमगावच्या वतीने स्व. भगवतीबाई परमानंद असाटी यांच्या स्मृतीत भव्य ओपन रात्रकालीन क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन गुरुवार(दि.२२)ला करण्यात आले.या स्पर्धेचे उदघाटन संदिप असाटी यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून छोटू हरींणखेडे, बाळु उईके, मुकेश शेंडे, पराग कटरे व सर्व बींग ह्युमण क्लब आमगावचे सदस्य उपस्थित होते. क्रिकेट स्पर्धेचे प्रथम बक्षिस १५५५१ व द्वितीय बक्षिस ७७७७ ठेवण्यात आले असून परिसरातील क्रिकेट संघानी यात सहभाग घेतलेला आहे.