गुरनोली फाट्यावर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

0
7

कुरखेडा,दि.२४: कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील गुरनोली फाट्याजवळ एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.साधारणत: ५० वर्षे वय असलेला हा इसम शर्ट व हाफपँट घातलेला आहे. दाढी व डोक्याचे केस वाढलेले असून, तो हडकुळा आहे. विमनस्क अवस्थेत तो बरेचदा गेवर्धा व कुरखेळा भागात फिरत होता. कुणी काही पदार्थ खायला दिलेच तर तो स्वीकारत होता. आज अचानक त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप उलगडलेले नाही.