खंडणीप्रकरणी अखेर भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल

0
7

नगर,दि.२४:- फोर्ड शोरूममधील मॅनेजर व सेल्स मॅनेजर यांचे अपहरण, त्यांना मारहाण करणे व खंडणीप्रकरणी तक्रारीवरून खासदार दिलीप गांधी, त्यांचे चिरंजीव नगरसेवक सुवेंद्र, कार्यकर्ता पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान 24 तासांत दिलीप गांधी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने काल (शुक्रवारी) पोलिस महानिरीक्षकांना दिले होते.फोर्डच्या शोरूमचे संचालक भूषण बिहाणी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्देश देताना हा तपास सीआयडीकडे द्यावा, असेही कोर्टाने सांगितले.

औरंगाबाद खंडपीठाने खासदार गांधी यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश शुक्रवारी दिले होते. तसेच या गुन्हाचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा, असेही औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. २९ सप्टेंबर २०१५ रोजी बिहाणी यांना खंडणी मागितली गेल्याचे बिहाणी यांचे म्हणणे आहे. दिलीप गांधी यांच्या मुलाने बंदुकीचा धाक दाखवून वेळोवेळी पैशाची मागणी केली असून सुमारे ५० लाख रुपयांची खडणी घेतली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या बाबतचे सर्व कॉल रेकॉर्ड फोन मेसेज बिहानी यांनी पोलिसांना दिले आहेत. या चार ही जनांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.