छत्रपती शिवराय आधुनिक, विज्ञानवादी विचारसरणीचे राजे-अमोल मिटकरी

0
25

नांदेड,दि. २६ :  -छत्रपती शिवरायांनी स्वराज्यामध्ये आधुनिकता, विज्ञानवादी विचारसरणीवर जास्तीत जास्त भर दिला. त्यामुळेच स्वराज्याचा विस्तार वाढवण्यास छत्रपती शिवरायांना यश आल्याचे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध विचारवंत अमोल मिटकरी यांनी लिंगापूर ता. हदगाव येथे आयोजित शिवजन्मोत्स सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना केले. शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्यायाधीश (नि.) तथा ग्राहक तक्रार मंचचे अध्यक्ष के.आर. देवसरकर तर उद्‌घाटन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजीराव पवार यांनी केले. सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष डॉ. गणेश शिंदे, इंजि. शे.रा. पाटील, पंडितराव कदम, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश संघटक चक्रधर पाटील, जिल्हाध्यक्ष नांदेड विनीत पाटील, जिल्हाध्यक्ष यवतमाळ राम कदम, त्रिशुल पाटील, भगवती हॉस्पिटलचे संचालक डॉ. अंकुश देवसरकर, युवक कॉंग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष शिवाजी पा.वाघीकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कदम, अनिल पा.कदम, साक्षी देवसरकर, तालुकाध्यक्ष श्रीकांत शिंदे, शिवराज पवार, अमोल वाघीकर, संदीप पावडे, संयोजक तथा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत देवसरकर आदी विचारपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना अमोल मिटकरी यांनी छत्रपती शिवरायांनी प्रत्येक किल्ल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी तलाव बांधले. ते उत्तम अभियंत्यापेक्षा सरस होते. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये स्वराज्यामध्ये कधीच दुष्काळ पडला नाही. त्या काळामध्ये शेतकऱ्यांनी एकही आत्महत्या केल्याचे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. शिवरायांनी युद्धनीती व चाणाक्ष नीतीचा वापर करून त्यावेळच्या राज्यकर्त्यांना नामोहरण केले. आजच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा अभ्यास करून राज्य चालवले तर निश्चितच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असेही अमोल मिटकरी यांनी सांगितले.
प्रास्ताविकामध्ये संयोजक भागवत देवसरकर यांनी गेल्या 18 वर्षांपासून आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्या मागची भूमिका विषद केली. यावेळी मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, विभागीय अध्यक्ष डॉ. गणेश शिंदे, माधव देवसरकर, के.आर. देवसरकर आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक कार्यात उल्लेखणीय कार्य केल्याबद्दल गौरव कार्यकतृत्वाचा के.आर. देवसरकर, डॉ. अंकुश देवसरकर, माधव पा.देवसरकर यांचा गावकऱ्यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सदाशिव अमृते, राजेंद्र कदम, रमेश पवार, कृष्णा कदम, नागोराव देवसरकर, संतोष कांडले यांच्यासह परिसरातील हजारो शिवप्रेमी बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष संतोष देवसरकर, दत्तराव देवसरकर, संतोष देवसरकर, शिवाजी देवसरकर, ज्ञानेश्वर देवसरकर, विद्याधर देवसरकर, गजानन देवसरकर, गणेश देवसरकर, संदीप देवसरकर, अनिल देवसरकर, विशाल देवसरकर, अविनाश देवसरकर, नरेश देवसरकर, बापुराव देवसरकर, यज्ञवलकी देवसरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन चक्रधर पाटील तर आभार अनिल देवसरकर यांनी मानले.