होळीत खेळला जाणारा आदिवासी खेळ – आती पाती

0
7
सध्या जिकडे तिकडे होळीच्या तयारीची हुळहुळ लागली आहे. निसर्गाने सुद्धा तशी तयारी सुरू केली आहे. परसफुल बाहेरून निघाले आहेत. जिकडे तिकडे रानावनात केशरी फुलांचे गालिचे आच्छादन केलेले आढळत आहेत. ह्याच तयारी सालेकसा तालुक्यातील आदिवासी बांधव सुद्धा तयारी ला लागले आहेत. गावात सध्या तयारी सुरू आहे ती म्हणजे आदिवासी तरुणांच्या आवडीचा आणि वर्षभरापासून आतुरता असलेल्या आतिपाती खेळाची. तस हे खेळ आज फक्त दिसतोय आदिवासी पाड्यातच. ह्या खेळात खेळाडूंची मर्यादा नाही त्यामुळे जेवढे पण तरुण ह्यात सहभागी घेऊ शकतात. शक्यतो हा खेळ ज्या रात्री होळी दहन होते त्या रात्री अंधारात खेळला जातो. खेळाडू दोन गटात विभागले जातात, नंतर कवलारू खपरेलच्या तुकड्याचे सिक्यासारखे वापर करून हवेत फेकून चित पट करून निर्णय घेऊन एक गट लपणे आणि एक गट शोध पथकाची भूमिका पार पाडते. हे तस भातुकली सारखच पण ह्यात शोधणारा एक नसून संपूर्ण गट शोधण्याचा जिम्मा घेतो. ह्यात लपणारा गट “आती पाती मार गली ची आटी, घेऊन ये पिंपळाची पाती” अशी उद्घोषणा देत एक गट गावाच्या वेशीत आणि घराच्या बाहेर कुठेही लपून राहतात. नंतर शोधणारा गट सांगितलेल्या झाडाची पान तोडून ते सोबत घेऊन लपलेल्या गटाला शोधतात. लपलेल्या गटांचे एक एक करून सर्व सदस्य सापडले की नंतर शोधणारा गट “आती पाती मार गली ची आटी, घेऊन ये चिंचाची पाती” (अजून कुठलेही झाडाची पाने आणण्यास सांगू शकतात) उद्घोषणा देत लपणार्या गटाला आता शोधण्याचे काम सोपाहुन आपण लपून असतात. अश्या प्रकारे हा खेळ आळीपाळीने रात्रभर सुरू असतो. आणि सकाळ झाली की पळस फुलाने तयार केलेले जैविक रंग वापरून होळीचा सण साजरा करतात. ही जुनी परंपरा आजही सालेकसा तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर बघायला मिळते . चला तर मग आपणही ह्या वर्षी हीच परंपरा राखत खेळूया आती- पाती चा खेळ.
राहुल हटवार
अध्यक्ष
सालेकसा विकास संस्था सालेकसा