भारतीय जैन संघटनेने दिल्या गाळउपसाकरीता 134 जेसीबी

0
91

बुलडाणा,दि.27ः- येथीस भारतीय जैन संघटना (BJS) द्वारे दुष्काळमुक्त अभियान व सुजलाम सुफलाम बुलडाणा उपक्रम अंतर्गत 134 JCB मशीन व 10 पोकलेन मशीन जिल्हयातील धरणामधील गाळ काढण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.या जेसीबी व पोकलन मशीन पुजनाचा कार्यक्रम भारतीय जैन संघटन कार्यकर्त्याद्वारे  आयोजित करण्यात आले होते.यावेळी BJS संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मूथा,जिल्हाधिकारी चंद्रकांत पूलकुंडवार,मुख्य कार्यकारी अधिकारी षणमुखानंद तसेच उपजिल्हाधिकारी, उप मुख्यकार्यकारी अधिकारी व सर्व BJS पदाधिकारी उपस्थित होते.सदर मशीन जिल्हयातील धरणातील गाळ काढण्यासाठी मोफत पुरवण्यात येणार आहे.तर डिझेल शासनाद्वारे पुरविण्यात येणार आहे.एवढ्या मोठ्याप्रमाणात सामाजिक संघटनेेने जेसीबी व पोकलन उपल्बध करुन देण्याची विदर्भातील पहिलीच वेळ आहे.जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी सामाजिक कार्याची स्तुती करीत प्रथमच येवढ्या मशीन पहायला मिळाल्याचे गौरवउदगार काढले.येत्या 4 मार्चला या सर्व मशीनचे उदघाटन व वाटप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे .भारतात प्रथमच एखाद्या सामाजिक संघटना द्वारे येवढ्या मशीन शेतकऱ्याला गाळ काढण्यासाठी मोफत पुरवण्यात येणार आहे हे विशेष .हा पायलट प्रकल्प असून यानंतर 2500 JCB मशीन संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळमुक्ती व सुजलाम सुफलाम महाराष्ट्र यासाठी देण्यात येणार आहेत.