खराशी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

0
18

भंडारा,दि.27ः- खराशी येथे डावी कड़वी योजनेअंतर्गत गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण,माजी खा.नानाभाऊ पटोले यांच्या निधीतून जि.प.शाळेत सभागृह बांधकाम, शाळेसमोरिल रस्ता, चावळी बांधकाम, दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत सीमेंटरस्ता बांधकाम, नळ योजना, प.स.शेष फंड अंतर्गत मोरी बांधकाम या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजक म्हणून जि.प.चे माजी सभापती विनायकराव बुरडे तर अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य भरतभाऊ खंडाईत होते. प्रमुख वक्ते म्हणून स्वप्नपूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत वाघाये,प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य वर्षाताई रामटेके,प.स.सभापती रविंद्रजी खोब्रागडे,प.स.सदस्य विजय कापसे,पंकज शामकुवर, कृउबासचे संचालक वसंताजी शेळके, खराशीच्या सरपंच अंकिताताई झलके, उपसरपंच सुधन्वाजी चेटुले, माजी सरपंच सुभाष ढोके, माजी उपसरपंच योगेश झलके, जितेंद्र बोंद्रे, पुरुषोत्तम फटे, विलास झकले, रावजी फटे विद्यालयाचे मुख्याध्यापक कातोरे, विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक खोटेले, जि.प.प्राथ शाळा खराशीचे मुख्याध्यापक मुबारक सय्यद, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. गावात विकासकामे लवकर मार्गी लागावित यासाठी ग्रामपंचायत कायम प्रयत्नशील असल्याचे सरपंच अंकीताताई झलके यांनी सांगितले. भूमिपूजन कार्यक्रमानंतर असर फाउंडेशनच्या वतीने सामाजिक जनजागृतीवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपरसपंच सुधन्वा चेटुले यांनी तर सूत्रसंचालन रामकृष्ण चाचेरे यांनी आणि आभार मुबारक सय्यद यांनी मानले.