मुख्य बातम्या:
शहिदांना गोंदिया व गडचिरोली पोलिसांतर्फे मानवंदना# #धानासंदर्भात समस्या सोडविण्यासाठी दिवाळीपूर्वी मुंबईत बैठक-ना.गिरीश बापट# #सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करावे- ना.गिरीश बापट# #पुस्तकांनी मस्तक घडते-गोविंद मुंडकर# #पालकमंत्र्यांनी केली धान पिकाची पाहणी# #टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे-पालकमंत्री बडोले# #आंदोलनानंतर घोटीत कारवाईची दहशत - सर्पदंश प्रकरण# #गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात १५ दिवसात समिती निर्णय घेणार - पालकमंत्री# #धान खरेदी प्रक्रियेत सूसुत्रता आणा - अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट# #शेतकर्‍यांचे २३ रोजी दिल्लीत 'जवाब मांगो आंदोलन'

प्रफुल पटेलांशी संबध सांगून राष्ट्रवादीच्या नेत्याने 25 लाखांना गंडविले

अमरावती,दि.28 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची ओळख असल्याचे सांगत नोकरी देण्याचे आमिष दाखविणाऱ्या अमरावती येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सुंदरकर याच्या विरोधात 25 लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी अमरावती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पायलटची नोकरी लावून देण्यासाठी ही रक्कम सुंदरकर याने एका युवकाकडून उकळली आहे.

रमेश अजाब खोरगडे असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यांचा मुलगा विनय खोरगडे याने 2011 मध्ये पायलटचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. 2013 मध्ये जेट एअरवेजमध्ये पायलट भरतीची जाहिरात प्रकाशित झाली. त्यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल होते. काहींनी प्रल्हाद सुंदरकर यांना भेटण्याचे खोरगडे यांना सुचविले. ‘आपली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी चांगली ओळख आहे. पटेल यांच्या माध्यमातून तुमच्या मुलाला नोकरी मिळवून देतो. यासाठी 25 लाख रुपये खर्च करावे लागतील,’ असे सुंदरकरने खोरगडे यांना सांगितले. या आमिषाला बळी पडून मुलाच्या नोकरीसाठी कसे तरी जुळवाजुळव करून खोरगडे कुटुंबियाने 25 लाख रुपये सुंदरकरला दिले.

मात्र, जेट एअरवेजने घेतलेल्या लेखी चाचणीत विनय खोरगडे यांचे नाव नव्हते. यामुळे जेट एअरवेजमध्ये त्यांना नोकरी न मिळाल्याने सुंदकरकडे पैशासाठी तगादा लावणे सुरू केले. सुंदरकर पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत होता. अनेकदा मागणी करून सुंदरकरने पैसे परत न केल्याने अखेर खोरगडे यांनी अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात सुंदरकर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Share