एसटी बसची मोटारसायकलला धडक: पिता ठार, पुत्र गंभीर जखमी

0
15

कुरखेडा, दि.२८: समोर जाणाऱ्या मोटारसायकलला ओव्हरटेक करणारी मोटारसायकल विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला जाऊन धडकल्याने पिता ठार, तर पुत्र गंभीर जखमी झाल्याची घटना काल(दि.२७) संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कुरखेडा-अंतरगाव रस्त्यावरील पलसगड गावानजीकच्या वळणावर घडली.लहानू ठलाल(५२)असे मृतकाचे, तर प्रदीप ठलाल (३०) दोघेही रा.घाटी असे जखमी युवकाचे नाव आहे

माहितीनुसार, खेडेगाव (अंतरगाव)येथे मंडईनिमित्त भरलेल्या कोंबड बाजारात काती बांधण्यासाठी गेलेले घाटी येथील ठलाल पितापुत्र बाजार आटोपून मोटारसायकलने गावाकडे परत जात होते. पलसगड गावानजीक असलेल्या वळणावर समोर जाणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलला ओव्हरटेक करीत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला मोटारसायकल जाऊन धडकली. यात दोघेही बापलेक गंभीर जखमी झाले. लगेच त्यांना कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात नेत असतांना वाटेतच लहानू ठलाल यांचा मृत्यू झाला, तर प्रदीपवर गडचिरोलीत उपचार सुरु आहेत