मुख्य बातम्या:

३ मार्च रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत जिल्ह्यात

गोंदिया,दि.२८ : सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ.दिपक सावंत हे ३ मार्च रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी १० वाजता नागपूर येथून मोटारीने भंडारा-कोहमारा मार्गे गोंदिया जिल्हयाकडे प्रयाण. दुपारी १२.३० वाजता सडक/अर्जुनी तालुक्यातील घटेगाव येथील आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२.४५ वाजता आरोग्य उपकेंद्र घटेगाव येथून मोटारीने खोडशिवनीकडे प्रयाण. दुपारी १ वाजता सडक/अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी २ वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी येथून मोटारीने नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील.

Share