मुख्य बातम्या:
शहिदांना गोंदिया व गडचिरोली पोलिसांतर्फे मानवंदना# #धानासंदर्भात समस्या सोडविण्यासाठी दिवाळीपूर्वी मुंबईत बैठक-ना.गिरीश बापट# #सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करावे- ना.गिरीश बापट# #पुस्तकांनी मस्तक घडते-गोविंद मुंडकर# #पालकमंत्र्यांनी केली धान पिकाची पाहणी# #टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे-पालकमंत्री बडोले# #आंदोलनानंतर घोटीत कारवाईची दहशत - सर्पदंश प्रकरण# #गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात १५ दिवसात समिती निर्णय घेणार - पालकमंत्री# #धान खरेदी प्रक्रियेत सूसुत्रता आणा - अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट# #शेतकर्‍यांचे २३ रोजी दिल्लीत 'जवाब मांगो आंदोलन'

भररस्त्यात कृषी अधिकाऱ्याला मारहाण

परभणी ,दि.२८ : पूर्णा येथे नव्याने रुजू झालेले तालुका कृषी अधिकारी यांच्या गाडीला धडक देत त्यांना भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी झिरो फाटा येथे घडली. जि.इ. खूपसे पाटील असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नवा असून त्यांच्यावर सध्या जिल्हा रुग्णालय परभणी येथे पुढील उपचार सुरु आहेत.घटनेच्या निषेधार्थ राज्य कृषी सहाय्यक संघटना परभणी यांच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन दिले देण्यात आले असून आरोपीवर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पाटील हे काही दिवसांपूर्वीच पूर्णा येथे कृषी अधिकारी पदावर रुजू झाले आहेत. मंगळवारी कार्यालयीन कामकाजानंतर सायंकाळी परभणी येथे बैठकीसाठी जात होते. झिरो फाटा येथे आले असता त्यांच्या वाहनास अज्ञात वाहनाने मागील बाजूने धडक दिली. यानंतर त्या गाडीतून काही अज्ञात व्यक्तीने उतरून पाटील यांना काही कळण्याच्या आता मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर मारहाणकर्ते तेथून पसार झाले.

Share