मुख्य बातम्या:
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह# #मेंढे यांच्या मूळगावासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी# #अंकुश शिंदे सोलापूरचे नवीन पोलीस आयुक्त, तर एम. बी. तांबडें नवे नक्षलचे पोलीस उपमहानिरिक्षक# #जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान# #कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान# #वंचित बहुजन आघाडीमुळे दोन माजी मुख्यमंत्र्याना पराभवाचा फटका# #५0 हजारांची लाच स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला अटक# #निशुल्क एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम# #भारतीय सैन्यात महिला सैनिक पोलीस भरती# #खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

उद्योगशिल युवकांना मुद्रा योजनेत कर्ज देणे बँकांना अनिवार्य-जिल्हाधिकारी

* प्राप्त अर्जाचा तात्काळ निपटारा करा
* तरुण आणि किशोर मध्ये जास्त कर्ज द्या
* बँकांनी मुद्राची प्रसिध्दी करावी

भंडारा,दि.१: – प्रधानमंत्री मुद्रा योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे. तरुणांच्या हाताला उद्योग देण्यासाठी सुरु केलेल्या मुद्रा योजनेत बँकेकडे अर्ज करणाऱ्या प्रत्येक उद्योगशील तरुणाला मुद्रा योजनेत कर्ज देणे अनिवार्य आहे. मुद्रा योजनेत बँकांचे परफॉर्मन्स ऑडिट करण्यात येईल. मुद्रा योजनेत कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकेवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यलय येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुद्रा योजना जिल्हा समन्वय समितीची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. सदस्य सचिव व जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड, अग्रणी बँक व्यवस्थापक आर. एस. खांडेकर व जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते यावेळी उपस्थित होते.
भंडारा जिल्हयात सन 2016-17 मध्ये शिशु,किशोर व तरुण मिळून 5 हजार 726 अर्जदारांना 30 कोटी 22 लाख 77 हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. सन 2017-18 डिसेंबर अखेर 4 हजार 342 अर्जदारांना 35 कोटी 98 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. राज्यामध्ये भंडारा जिल्हयाची रँकिंग 30 आहे. यावर जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यकत केली. बँकाच्या टाळाटाळ प्रवृत्तीमुळे जिल्हयाची रँकिंग कमी आहे असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, मुद्रा योजनेत बँकांचे परफॉर्मन्स ऑडिट करण्यात येईल. ज्या बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतील त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केली जाईल.
मुद्रा योजनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. जुनेच उद्योग करणाऱ्यांना कर्ज देण्यापेक्षा नवीन उद्योग सुरु करणाऱ्या युवकांना कर्ज देणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. मुद्रा योजनेत बँकांच्या शाखांनी जास्तीत जास्त केसेस करणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त कितीही केसेस करु शकता, असे ते म्हणाले. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी बँकांनी शिशु योजनेत जास्त केसेस केल्याचे निदर्शनास आले असता तरुण व किशोर योजनेत जास्तीत जास्त कर्ज देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मुद्रा योजनेत कर्ज घेऊन उद्योग सुरु करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांना बँक मोघम उत्तर देऊन त्यांचा अर्ज रद्द करत असल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. यावर नाराजी व्यक्त करून यापुढे अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित शाखा व्यवस्थापकावर कारवाईची शिफारस करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. केवळ उद्योगच नाही तर शेती पूरक व्यवसायाला सुध्दा या योजनेत कर्ज देण्यात यावे. आरसेटी व शासनाच्या विविध प्रशिक्षण संस्थेतून प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना मुद्रा योजनेत प्राधान्याने कर्ज देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
नॉन परफॉर्मंस शाखांचा आढावा जिल्हा समन्वयकांनी शाखा निहाय घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुद्रा योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी यासाठी बँकांनी जनजागृती मोहीम, मेळावे घेणे व प्रत्येक शाखेत मुद्रा योजनेचा फलक लावणे आदी बाबी प्राधान्याने कराव्यात. मुद्रा योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Share