२५ मार्चपर्यंत महिला रुग्णालयाच्या बांधकामाला होणार सुरुवात

0
9

भंडारा,दि.01ः-जिल्हा महिला रूग्णालयाकरिता आवश्यक निधीची तरतूद झाली असल्याने रूग्णालयाचे बांधकाम करण्यासाठीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, या मागणीसाठी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालण्यात आला. अभियंत्यांनी २५ मार्चपर्यंत प्रक्रि या पूर्णकरून रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात करू, असे आश्‍वासन दिले. दिलेल्या आश्‍वासनानुसार प्रक्रिया पूर्ण केली नाही तर कार्यकारी अभियंत्यांना काळे फासू, असा ईशारा नरेंद्र भोंडेकर यांनी दिला.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता नवघरे यांचेशीही भोंडेकर यांनी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली.
यावेळी शिवसेनेचे संजय रेहपाडे, अनिल गायधने, अँड. रवी वाढई, यशवंत सोनकुसरे, सुरेश धुर्वे, दिनेश गजबे, नितेश मोगरे, सतिश तुरकर, मयूर लांजेवार, ललीत बोंद्रे, अख्तर बेग मिर्झा, संदीप सार्वे, राजू थोटे, कृष्णा ठोसरे, पंकज दहीकर, ईश्‍वर टाले, निखील उपरीकर, श्रीकांत पंचबुधे, मुकेश राऊत व शिवसैनिक उपस्थित होते.
जिल्हा महिला रूग्णालयाच्या बांधकामाकरिता अंदाजपत्रक तयार करणे, निवीदा काढणे आदि प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी माजी आमदार भोंडेकर यांच्या नेतृत्वात बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देवून कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालण्यात आला.
भंडारा येथे स्वतंत्र जिल्हा महिला रूग्णालय मंजूर झाले असून, त्यासाठी आवश्यक तो निधी शासनाने मंजूर केला आहे. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सतत पाठपुरावा केल्याने मागील हिवाळी अधिवेशन काळात शासनाने २५ लाख रुपये टोकन निधी उपलब्ध करून दिला. परंतु, अनेक महिने लोटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने रूग्णालय बांधकामाचे अंदाजपत्रक तयार केले नाही. महिला रूग्णालयाकरिता शासन सकारात्मक असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालढकल केली जात आहे. दरम्यान, नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी बांधकाम विभागाच्या कार्यालयात धडक देत कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. यावेळी चर्चेदरम्यान, रूग्णालयाचे अंदाजपत्रक तयार करणे व निवीदा प्रक्रिया पूर्ण करणे ही प्रक्रिया येत्या १५ मार्चपयर्ंत पूर्ण करण्यात येईल तसेच २५ मार्चपयर्ंत प्रत्यक्ष कामाला सुरूवात करू, असे आश्‍वासन कार्यकारी अभियंता ऋषीकेश राऊत यांनी दिले.