भूमिपूजन कार्यक्रमातून स्थानिक जिप सदस्याचा अपमान !

0
20
– जिप सदस्या दसरे यांनी केली सात जणांविरूध्द मुकाअकडे तक्रार
– प.स.सदस्य लिल्हारेंना जि.प.सदस्य होण्याची हौश
गोंदिया,दि.01ः- तालुक्यातील रतनारा (खातिटोला) येथे जिल्हा परिषदेअंतर्गत तयार करण्यात येणाèया रस्ता बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात संबंधित विभागाच्या अधिकाèयांनी राजशिष्टाचार न पाळता स्थानिक जिप सदस्यांना आमंत्रित न करता अपमान केल्याचा आरोप जिप सदस्य व माजी सभापती छाया दसरे यांनी केला आहे. याप्रकरणी २६ फेबु्वारी रोजी त्यांनी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे या संबंधित विभागाचे अधिकारीसह सात जणाविरुद्ध तक्रार नोंदविली आहे.
दरम्यान, या प्रकरणाने परिसरासह जिल्ह्यातील राजकारणात चर्चांना पेव फूटले असून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. तर जिल्हा परिषद वर्तुळातही खळबळ माजली आहे.
जिप सदस्य व माजी सभापती दसरे यांनी दिलेल्या पत्रकानुसार जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे गंगाझरी-खातिटोला-दवनीवाडा या मार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे.हा क्षेत्र जिप सदस्य छाया दसरे यांचे असून या रस्त्याच्या बांधकामासाठी संबंधित विभागाकडून रतनारा (खातिटोला) येथे ९ फेब्रुवारी रोजी भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर भूमिपूजक म्हणून तिरोडा-गोरेगाव विधान सभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले होते.
दरम्यान, राजशिष्टाचाराच्या नियमाप्रमाणे संबंधित क्षेत्राच्या जिप सदस्याला कार्यक्रमात निमंत्रित करणे बंधनकारक आहे. असे असताना कार्यक्रमात श्रीमती दसरे यांना निमंत्रितच करण्यात आले नाही. उलट भूमिपूजन कार्यक्रमाच्या माहितीचे त्याठिकाणी फलक लावण्यात आले असता लावण्यात आलेल्या फलकातही पदाधिकाèयांचे नाव व पद यांच्यात चुका करण्यात आल्या.पंचायत समिती सदस्यांना जिल्हा परिषद सदस्य दाखविण्यात आले.त्यामुळे प.स.सदस्याला फलकावरच जि.प.सदस्य होण्याची हौस आली की काय अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. फलकावर भूमिपूजक म्हणून आ. विजय रहांगडाले यांचे नाव व पद देण्यात आले असतानाच पंस सदस्य हितेंद्र (गुड्डू) लिल्हारे यांचेही नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हितेंद्र लिल्हारे हे पंस सदस्य असताना फलकावर त्यांच्या नावासमोर जिप सदस्य असे पद लिहीण्यात आले आहे. त्यामुळे संबधित अधिकाèयांनी स्वत:च्या मर्जीनेच श्रीमती दसरे यांचे पद पंस सदस्य लिल्हारे यांना दिल्याचे दिसते.
दसरे यांनी दिलेल्या पत्रकानुसार आ. रहांगडाले यांनी भूमिपूजन केले असता त्यांना फलकावरील चुक कशी लक्षात आली नाही? असा सवाल दसरे यांनी केला असून विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा सदस्यांप्रमाणेच जिप सदस्यांनाही राजशिष्टाचार कायदा लागु असून असे असताना संबंधित विभागाच्या अधिकाèयांनी राजशिष्टाचार कायदा न पाळता जाणून हे कृत्य केल्याचा आरोप जिप सदस्य दसरे यांनी केला आहे.
दरम्यान, दसरे यांनी या प्रकरणी अ‍ॅड. शैलेंद्र गडपायले यांच्या मार्फत कार्यक्रमातील भूमिपूजक आ. रहांगडाले, पंस सदस्य हितेंद्र लिल्हारे यांच्यासह वळद गावचे सरपंच अशोक माहुरकर, झालुटोलाचे सरपंच शंकर टेंभरे, जिप सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस. वैरागकर, उप अभियंता एस. एस. शुक्ला, डी. टी. निमकर, अशा सात जणांविरुध्द जिप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.