बेरोजगार पदवीधरांनी पेटविली पदव्यांची होळी

0
14

अमरावती/राजूरा/चांदुररेल्वे : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आवाहनानुसार  १ मार्च रोजी  स्थानिक इर्विन चौकात डिग्री जलाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनांनी शैक्षणिक डिग्रीच्या प्रतिकात्मक कॉपी जाळून सरकारचे लक्ष वेधले. केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करीत वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करण्यात आली.
दिवसेदिवस उच्च शिक्षण घेणाऱ्याची संख्या वाढत आहे. मात्र, उच्च विद्याविभूषितांना नोकºया नाहीत. भाजप सरकारने निवडणुकीत बेरोजगारांना काम देण्याची घोषणा केली. मात्र, अंमलात आणली नसल्याचा आरोप समितीचे अमोल भिसेकर यांनी केला. यावेळी आंदोलनात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे राजेंद्र आगरकर,सुभाष धोटे, प्रवीण भस्मे, महेश देशमुख, नंदकिशोर शेरे, रजंना मामर्डे, अरूण साकोरे, नागेश डोरलीकर, अज्जू भाई, गोपाल प्रधान, सतीश प्रेमलवार आदी उपस्थित होते.
चांदूररेल्वेत शासनाचा निषेध
शेकडो तरुणांनी हाताला काम न मिळाल्याने शासनविरोधी घोषणा देत शैक्षणिक पदवीचे दहन केले. विदर्भविरोधी नीतीचासुद्धा निषेध नोंदविला. यावेळी आशिष वानखडे, अजय बानाईत, ओमप्रकाश मानकर, सुधीर डोंगरे, सुशील कचवे, पवन महाजन, रोशन भोयर, संदीप भगत, सारंग राऊत, शुभम लंगडे, सुधाकर कांबळे, विजय डोंगरे, गजानन राजूरकर, ललित सदाफळे, सौरभ होले, अनिकेत घाटोळ आदी उपस्थित होते. चांदूर रेल्वेच्या एसडीओंना स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

राजुराः– येथील पंचायत समिती चौकात मोठ्या संख्येने युवक व समितीचे कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी बोलताना अनेक बेरोजगार इंजिनिअर व पदवीप्राप्त युवकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आणि आपल्या डिग्रीचा काहीही उपयोग होत नसून घरची जबाबदारी कशी पेलायची, असा यक्षप्रश्न असल्याचे सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. वामनराव चटप, प्राचार्य अनिल ठाकूरवार, युवा आघाडीचे विदर्भ सचिव कपील इद्दे, मिलिंद गड्डमवार, बाजार समिती सभापती हरिदास बोरकुटे, युवा नेते जीवन तोगरे, प्रेम चव्हाण, अमोल चव्हाण, निखील बोंडे, नगरसेवक मधुकर चिंचोलकर, दिलीप देरकर आदी उपस्थित होते. ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौकात बेरोजगार पदवीधारकांनी एकत्र येत पदव्यांच्या सत्यप्रतींची होळी पेटविली.