नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रदीप नागपूरकर

0
12

नांदेड,दि.04ः-मराठी पत्रकार परिषद मुंबईशी सलंग्न असलेल्या नांदेड़ जिल्हा मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी जाहिर करण्यात आली.यात अध्यक्षपदी प्रदीप नागपुरकर तर कार्यध्यक्ष गोवर्धन बियानी,सरचिटणीस पदी सुभाष लोने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जुगलकिशोर धुत,निवडणूक निरीक्षक म्हणून परिषदेचे उपाध्यक्ष विजय दगड़ू उपस्थित होते.सहायक निवडणूक अधिकारी म्हणून राजकुमार कोटलवार यांनी काम पाहिले.निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष व सरचिटणीस या दोनच पदासाठी प्रत्येकी एक अर्ज राहिल्याने तसेच कार्यकारणी सदस्यासाठी सात अर्ज आल्याने या सर्वाचे बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जुगलकिशोर धुत यांनी जाहिर केले. अध्यक्ष प्रदीप नागापुरकर,कार्यध्यक्ष पदी गोवर्धन बियानी, सरचिटणीस सुभाष लोने याची बिनविरोध जाहिर केले.कार्यकारणी सदस्य म्हणून दिपक बारालीकर,सचिन डोंगळीकर,एस एम मुदखेडकर,हर्ष कुंडलवडिकर,सौ उज्वला भवरे,जयराम बन्ने, सुनील पौळकर यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.कोषाध्यक्ष राजेश शिंदे, परिषद प्रतिनिधि नरेश दंडवते, हरिहर धुतमल,(लोहा),बाळासाहेब पांडे(नायगांव),तुकाराम सावंत,(सिडको),लक्ष्मण भवरे, यासीन बेग इनामदार,सहसचिव-राजेन्द्र कांबळे,अड,दिगांबर गायकवाड़,आजम बेग,अनिल धमने,संजय कोलते, जिल्हा समन्वयक, कृष्णा उमरीकर,प्रसिद्धी प्रमुख शिवाजी कोणपुरे,(ग्रामीण),नंदकुमार कांबळे(शहर),उर्वरित कार्यकारणी सदस्य-एल ए हिरे, जी,पी मिसाळे,धोंडीबा बोरगावे ,सुनील पारडे,अब्दुल समद, सुनील पौळकर,प्रवीण कंधारे, गजानन चौधरी,राजू ताटे यांची निवड जाहीर करण्यात आली.जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यामार्गदर्शक पदी मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष जेष्ठपत्रकार संजय कुलकर्णी,प्रजावानीचे संपादक शंतनू डोईफोडे,विभागीय सचिव विजय जोशी, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश कांबळे,माजी सरचिटणीस, चारुदत्त चौधरी,परिषदेचे सदस्य राम शेवडीकर, जेष्ठ पत्रकार नागनाथ देशमुख,जेष्ठ पत्रकार धोंडोपंत विष्णुपुरीकर हे राहणार आहेत.