भरधाव ट्रॅक्टर झाडावर आदळून तिघे जखमी

0
12
तिरोडा,दि.04 : तालुक्यातील मुंडीकोटा येथून घाटकुरोडाकडे भरधाव वेगाने जात असलेला ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर झाडावर आदळून गंभीर जखमी झाला असून ट्रॅक्टरवरील मजुरांनी उड्या मारल्याने ते किरकोळ जखमी झाले तर ट्रॅक्टरचा चेंदामेंदा झाल्याची घटना आज ४ मार्च रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारस भोगरा येथे घडली.
घाटकुरोडा येथील रमन मेश्राम यांचा ट्रॅक्टर मुंडीकोटा येथे रेती खाली करून घाटकुरोडाकडे जात असताना भोगरा गावाजवळील वळणावर ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याने एका पळसाच्या झाडावर जावून आदळला. ट्रॅक्टर अनियंत्रित झाल्याचे लक्षात येताच ट्रॅक्टरवरील मजुरांनी उड्या मारल्याने ते किरकोळ जखमी झाले. मात्र, ट्रॅक्टरचालक नामदेव दामू इखार (२७) रा. घाटकुरोडा हा गंभीर जखमी झाला असून त्यास तुमसर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडारा येथे उपचाराकरिता पाठविले.
याबाबद मुंडीकोटाचे बीट साहाय्यक फौजदार बोंदरे यांना विचारणा केली असता जखमींना उपचाराकरिता भंडारा येथे पाठविण्यात आल्याने तिरोडा पोलीस स्टेशनला अजूनपर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नसल्याचे सांगितले.