‘पळस फुलला रानात’

0
93
वसंत ऋतूला सुरूवात झाली असून गोंदिया जिल्ह्यात  पळसाला फुले येण्यास सुरुवात झाली आहे. ‘पळसाला पाने तीन’ ही म्हण आपण नेहमीच ऐकतो. मात्र, या पळसाला विविध रंगांची फुले असतात. त्यातील पांढरा पळस दुर्र्मिळ आहे. अशाच पळसाच्या दोन रंगांची फुले खास आहेत. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात विविध प्रजातीची दुर्मिळ वृक्ष असून, याच वृक्षांवर लाखो पशुपक्ष्यांचा अधीवास असतो. मात्र, याच वृक्षांच्या माध्यमातून त्यांना खाद्य सामुग्रीही मिळत असते. अशाच दुर्मिळ वृक्षांचे संवर्धन व्हावे आणि याची माहिती भावी पिढीलादेखील मिळावी. या दृष्टिकोनातून सेंद्रिय शेतीतज्ञ अशी ओळख असलेले गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दुर्र्मिळ प्रजातीच्या वृक्ष संगोपनाचा संदेश देण्यासाठी दुर्मिळ वृक्षाचा शोध घेण्यास पुढाकार घेतला असून त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील जंगलव्याप्त भागातील लाल रंगाच्या पळसाच्या फुलांनी बहरलेल्या विविध छटा आपल्या कल्पक नजरेतून कॅमेºयात बंद केल्या आहेत