फडणवीस सरकारच लोकसभा पोटनिवडणूकीच्या विरोधात-नाना पटोले

0
13

गोंदिया जिल्हा काँग्रेसच्यावतीने पटोलेंचा सत्कार

गोंदिया,दि.०४ः मला वनवासात पाठविण्याची व्यवस्था ज्यांनी केली,त्यांच्याकडूनच काहीतरी शिकून आलो आहे.मी जीथे जाणार राहणार त्यांची सत्ता राहणारच भाजपमध्ये गेल्यावर भाजपची सत्ता आली. त्यांच्यात मात्र एक पध्दती आहे,त्यांचा कार्यकर्ता कितीही दुःखी असला तरी तो आपल्या पक्षाच्या विरोधात जात नाही.समजदारीने घेतो,त्यातच आपला काँग्रेसचा कार्यकर्ता मात्र हवेत असतो.यात कुठेतरी बदल येणे आवश्यक आहे.मी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.त्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणूक व्हायला हवी.परंतु राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला आपल्या अपयशाचे भय असल्यानेच भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत असल्यानेच भाजपच्या नागपूर निवासी एका लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता म्हणून एकाला हाताशी धरुन न्यायालयात ही निवडणूक होऊ नये यासाठी धाव घेतल्याने या सरकारची किव येत असल्याचे प्रतिपादन महाराष्ठ्र प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोेले यांनी केले.
ते गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित प्रताप लॉन येथील सत्कार समारोह व कार्यकर्ता मेळाव्यात सत्कारमुर्ती म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार गोपालदास अग्रवाल होते.कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी,काँग्रेस जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे,माजी मंत्री भरत बहेकार,पन्नालाल शहारे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, सचिव डॉ. योगेंद्र भगत, विनोद जैन,  महिला बाल कल्याण सभापती लता दोनोडे, शिक्षण सभापती रमेश अंबुले, माजी आ. रामरतन राऊत, माजी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, झामसिंग बघेले, राधेलाल पटले, अ‍ॅड. के.आर. शेंडे, पी.जी. कटरे, राकेश ठाकूर, राजेश नंदागवळी, माधुरी हरिणखेडे, पं.स. सभापती राऊत सालेकसा, नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे अर्जुनी मोरगाव, सीमा अटरे, विमल नागपुरे, विजय लोणारे, गिरीष पालीवाल, विजय टेकाम, दिपक पवार, माधुरी कुंभरे, ज्योती वालदे, सरिता कापगते, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्रेहा गौतम, चमन बिसेन, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, जयप्रकाश बिसेन, हरिचंद कावळे, बंटी भेलावे, उषा शहारे, पृथ्वीपालसिंह गुलाटी, अशोक लंजे, नामदेव किरसान, अशोक चौधरी, डोमेंद्र रहांगडाले, दिलीप असाटी, शेषराव गिरीपुंजे, भागवत नाकाडे, संदीप भाटीया, वासुदेव चुटे, धनलाल ठाकरे, न.प. बांधकाम सभापती शकील मंसुरी, महेंद्र पुरोहित, सुनील तिवारी, सुनील भालेराव, निर्मला मिश्रा, शिलू चव्हाण, क्रांतीकुमार जायस्वाल, दिपीका रुसे, भागवत मेश्राम, पराग अग्रवाल, व्यंगक पाथरु, विशाल शेंडे, अमर वऱ्हाडे, निलम हलमारे, धिरज नशिने, विक्की गोहरे, आनंद तुरकर, धम्मानंद मेश्राम, रत्नदिप दहिवले, जहीर अहमद, जितेंद्र कटरे, कुरमराज चव्हाण, नितीन पुगलिया, रुखसाना सैय्यद, कैलास अग्रवाल, योजना कोतवाल, अ‍ॅड. पी.सी. चव्हाण उपस्थित होते. यावेळी कृउबास सभापती चुन्नी बेंद्रे, सडक अर्जुनीच्या माजी सरपंच उषा खोटेले, देवरीचे सेवानिवृत्त आयुक्त अनिल कुंभरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद लांजेवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पुढे बोलतांना पटोले म्हणाले की,भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत पंजा हे निवडणूक चिन्हा कायम राहील असे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहूल गांधीनी सांगितले असून त्यानुसारच आम्ही काम सुरू केले आहे. पोटनिवडणुकीसंदर्भात राज्यसरकारला निवडणुक आयोगाकडे शिफारस करावी लागते. परंतु राज्यातील फडणवीस सरकारने केली नाही, केली तर त्यांनी केलेला विकास पोटनिवडणूकीत नक्कीच जनतेसमोर दाखवू अशी ग्वाही देत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे स्वच्छता अभियानाच्या नावावर पैशाची लूट टॅक्सच्या स्वरुपात प्रत्येक नागरिकांकडून ०.५ टक्के या दरांने करीत आहेत.त्यासोबतच पेट्रोल,डिझेलसह आधी गोष्टीतही राज्यसरकार दुष्काळाच्या नावावर जनसामान्य शेतकèयांची करस्वरुपात लूबाडणूक करीत असल्याचे म्हणाले.एकीकडे स्वच्छतेच्या नावावर मोदी सरकार जनतेचे खिशे खाली करीत असतांनाच निरव मोदी,विजय माल्या ,ठक्करसारखे देश लूटून पळू लागले आहेत याला भाजपचे सरकारच कारणीभूत असल्याचे म्हणाले.कॉग्रेसने देशाच्या स्वातंत्र्यसाठी लढा दिला ,त्ता सविंधान वाचविण्यासाठी काँग्रेसला लढाई लढावी लागणार आहे.निवडणुकीचे निकाल बघितल्यास मतामध्ये येत असलेला फरक हा सर्वासांठी qचतनाचा विषय असून काँग्रेस कार्यकत्र्यांनी आपल्या काही चुकांना सुधारण्याची गरज असल्याचे सांगितले.मोंदीचा सबका साथ सबका विकास हा नारा म्हणजे आरएसएसचा विकास होय.यापासून सावध होण्याची वेळ आली आहे.महाराष्ट्रात १० हजार रोजगार उद्योग बंद झाल्याने बेरोजगारांच्या संख्येत वाढू लागली.मी कार्यकर्ता आहे तुमच्यासारखाच गावागावात कार्यकत्र्यासोबत बसून रणनिती तयार करावे लागणार आहे.काँग्रेसने निवडणुकीत पंजा द्यावा बाकी आम्ही बघू असे म्हणत सर्वजण मिळून काम करू मागून जो वार करेल त्याला तसेच उत्तर दिले जाईल हे लक्षात ठेवावे असे आवाहन केले.यावेळी सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना आमदार गोपालदास अग्रवाल म्हणाले की, मी जेव्हापासून जन्मलो तेव्हापासून काँग्रेसमध्येच आ.प्रपुल पटेल १९ वर्षापुर्वी तर ९ वर्षापुर्वी भाजपमध्ये नानाभाऊ गेले. नानाभाऊ गेले तरीही आपलेच होते, त्यामुळे त्यांच्या आगमनाबद्दल मला काही नविन वाटलेच नाही.भाजपसोबत गटबंधन एकट्या गोपाल अग्रवालने केले नाही,तर सर्वांच्या सहमतीने केले.गोंदिया पंचायत समितीच्या सत्तेतून काँग्रेसला दूर करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले.त्यांना कसे सहकार्य करणार काँग्रेस कार्यकर्ता अस्मिता जपण्यासाठी काम करीत आहे,अशातच जर कुणी आमच्या अस्मितेला धोका पोचवित असेल तर आम्ही ते सहन करणार नाही.पक्षाच्या पर्यवेक्षकांना पंंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची सर्व पाश्र्वभूमी माहित आहे.कमी संख्या राहूनही सत्ता हातात घेत काँग्रेसचे वर्चस्व ठिकवून ठेवण्याचे काम आम्ही केले आहे.विकासासोबत माझा संबध आहे, त्यासाठी मी जो कुणी सत्ताधारी असणार त्यांच्याकडे जाणार परंतु नितीमुल्य जपूनच हे ठाम सांगतो.नानाभाऊंच्या आगमनाने बळ आले आहे.देशात घोटाळे होत असताना जनता व माध्यम मात्र गप्प असल्याने जनतेपर्यंत ते पोचवण्याची जबाबदारी कार्यकत्र्यांची आहे.जोपर्यंत ७ विधानसभा व लोकसभा जिकंणार नाही तोपर्यंत नानाभाऊंचा खरा सत्कार होणार नाही हे सुध्या आपल्याला लक्षात ठेवणे आपली जबाबदारी असल्याचे विचार अग्रवाल यांनी व्यक्त केले.यावेळी माजी आमदार रामरतन राऊत,भरत बहेकार यांंचीही भाषणे झाली.संचालन अपुर्व अग्रवाल यांनी तर आभार अशोक चौधरी यांनी मानले.