एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभार १० वीचे पेपर सोडले उघड्यावर

0
14

गोंदिया,दि.०५-महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळ नागपूर विभागाच्यावतीने इयत्ता १० वीची परिक्षा १ मार्चपासून सुरु झाली असून या आज ५ मार्चला सुध्दा १० वीचा पेपर असल्याने गोंदियावरुन गोंदिया-देवरी या बसक्रमांक एमएच ४० -९९४८ ने पेपरचे गठ्ठे पाठविण्यात आले.बसचालक व वाहकाने देवरी बसस्थानकावर पेपरचे गठ्ठे कुणी उतरविण्यासाठी येईल याची वाट बघितल्यानंतर कुणीच न आल्याने देवरी -आमगाव मार्गावरील चौकात ज्याठिकाणी बसथांबा असतो त्याच ठिकाणी हे पेपरचे गठ्ठे उतरवून दिले. बेरार टाईम्सचे प्रतिनिधीने जेव्हा वाहक चालकाला विचारले त्यावेळी पेपरचे गठ्टे असल्याची त्यांनी कबुली सुध्दा दिली..त्यामुळे बसचालकाला सुध्दा आपण काय करीत आहोत याचे भान न राहिल्याने हा निष्काळजीपणा परिक्षा मंडळाच्या अंगावर येण्यासारखा प्रकार घडला आहे.वाहक साखरे  व चालक नाटेश्वरी यांच्याबद्दल देवरी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी गोंदिया आगाराला घडलेल्या प्रकाराबद्दल तसेच वाहक चालकाबद्दल तक्रार सुध्दा नोंदवली आहे.जेवढ्याप्रमाणात वाहक/चालक दोषी आहेत त्याचप्रमाणात देवरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी हे सुध्दा जबाबदार असून त्यांनी बसच्या वेळेआधी तिथे हजर राहणे आवश्यक होते.परंतु ते सुध्दा त्याठिकाणी हजर न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यावर सुध्दा कारवाई होणे गरजेचे झाले आहे.