बालिकेवर अत्याचार करणार्या आरोपीवर कारवाई करा

0
9
गडचिरोली,दि.05ः- धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथील ५ वर्ष्याचा मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्यासंदर्भातील मागणीचे निवेदन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या युवा आघाडी गडचिरोलीच्या वतीने देण्यात आले.दोंडाई येथे तेली समाजाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा व तसेच सदर घटना दाबण्यासाठी संबंधित शालेय शिक्षण संस्था ज्ञानोपासक शिक्षण संस्था मंडळ संचालित संस्था नूतन माध्यमिक विद्यालय व शाळेच्या संस्थाचालकांनी केलेल्या दबावगटाचा निषेध करीत , पिढीत बलिकेच्या आई- वडिलांना धमकवणार्या व आमिष देणार्या संस्था चालकाची योग्य ते चौकशी करून योग्य ते कारवाई करण्याची मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देते वेळेस महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चे उत्तर गडचिरोली जिल्हाधक्ष राहुल भांडेकर तसेच अतुल सोनटक्के, संतोष नैताम , शिरीष चापले , शुभम कोठारे , सारंग दुधबावरे, कुणाल खोबे , तुषार कुनघाडकर, अभिजित भांडेकर , नयन कुनघाडकर , स्वप्नील कोठारे,पंकज खोबे , तुषार वैरागडे हे उपस्थित होते.