सूर्याटोला येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

0
9
गोंदिया,दि.05 : स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, सूर्याटोलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे आयोजन ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार कुथे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन  न.प.चे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जितेंद्र रहांगडाले तर प्रमुख अतिथी म्हणून भरत क्षत्रिय, निलेश धुमाळ, संजय कुलकर्णी, दुर्गेश रहांगडाले, नगरसेविका भावनाताई कदम, अजाबराव धोटे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृतीला माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख वक्ते जितेंद्र रहांगडाले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी विपरीत परिस्थिती असताना सुध्दा त्यावर मात करून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना समान अधिकार, न्याय प्रस्थापित करण्यासाठी छोट्या छोट्या मावळ्यांनासोबत घेवून स्वराज्याची संकल्पना साकार केली. व पुढे जावून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून ते रयतेचे राजे झाले, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आजघडीला समााजाला आवश्यकता आहे, त्यांचे सांूर्ण जीवन प्रेरणादायी असून समाज घटकातील नागरिकांनी त्यापासून प्रेरणा घ्यावे, असे मत व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, राजकुमार कुथे, दुर्गेश रहांगडाले, नगरसेविका भावना कदम, संजय कुलकर्णी, निलेश धुमाळ  यांनी आपले विचार व्यक्त करून छत्रपती शिााजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकले. कार्यक्रमात मोठ्या संख्येत परिसरातील नागरिकाची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गेंदलाल कटारे यांनी केले. तर संंचालन डी.एम.राऊत यांनी केले. उपस्थितांचे आभार समितीचे संयोजक अरूण तुपकर यांनी मानले.
 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किसन वाढिवे, माधव रहांगडाले, लिखीराम राऊत, राजेंद्र कटरे, अशोक खापेकर, दिपक रहांगडाले, रवी हत्तीमारे, पंकज सोनवाने, मनोज काळे, छोटु रामटेककर, सचिन कटारे, राजु तुपकर, रमेश दलदले, भुमेश्वर गुडीकर, रामु तुपकर, दिपेश रहांगडाले यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.