भाजप-काँग्रेस म्हणजे काका पुतण्या 

0
11
बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांचा आरोप
गोंदिया, दि. ५ : वेगळ्या विदर्भाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र सत्तेत असलेल्यांच्या विरोधात ओरड करण्याची भाजप व काँग्रेसला सवयच आहे. राजकारणात हे दोन्ही पक्ष काका पुतण्याची भुमिका पार पाडत असून वेंâद्र व राज्यातील भाजपा सरकार जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवित लालीपॉप देत असल्याचा गंभीर आरोप बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी आज ५ मार्च रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
पूढे बोलताना साखरे म्हणाले भाजप सरकारने घेतलेले नोटबंदीसारखे निर्णय सपशेल अपयशी ठरले असून नोटबंदी, जीएसटी यामुळे गरीब व्यापाNयांचे नुकसान झाले आहे. देशात बेरोजगारी वाढत आहे. दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन या सरकारने सत्तेत येण्याआधी दिले होते. प्रत्यक्षात मात्र, एमआयडीसी सारखे अनेक उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहेत विंâवा बंद झालेले आहेत. वेगळ्या विदर्भाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून आहे. विरोधी बाकावर बसून काँग्रेसची सत्ता असताना भाजपने वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरली होती. सत्तेत आल्यास वेगळा विदर्भ करणार असे आश्वासन त्यांनी दिले होते. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. यावर आता विरोधी बाकावरून काँग्रेस आरोप प्रत्यारोप करीत आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष भारताच्या राजकारणात काका पुतण्याची भूमिका निभावत आहे असा आरोप करून त्यांनी  संपूर्ण महाराष्टात भाईचारा कमिट्या व सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून कार्यकत्र्यांना जोडण्याचे कार्य करण्यात येणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका बसप स्वबळावर लढणार आहे. तेव्हा विचारधारा एक असलेल्यांनी सोबत येऊन कार्य केल्यास त्यांचे पक्षात निश्चितच स्वागत करण्यात येईल. आपला पक्ष सत्तेत आल्यास विदर्भ, मराठवाडा, खानदेश व कोकण हे राज्य वेगळे करू असेही त्यांनी यावेळेस सांगितले. पत्रकार परिषदेला अ‍ॅड. संदीप ताजणे, कृष्णा बेले, जितेंद्र म्हैसकर, जिल्हाध्यक्ष पंकज वासनिक, गोंदिया जिल्हा प्रभारी तथा नगरसेवक पंकज यादव तसेच जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.