जगाला मानवतेकडे नेण्यासाठी बुध्दाशिवाय पर्याय नाही -सुरेशदादा गायकवाड

0
9
नांदेड/नायगाव,दि.06 :-  डाॅ.बाबासाहेब आंबेडकरानी 1956 साली धम्म दिक्षा घेतली.आणि आम्हाला बुध्द धम्माच्या ओटीत टाकले.म्हणूनच आम्ही अनिष्ट चालीरीती, पाप ,पुण्य कर्मकांड,स्वर्ग, नरक या पलिकडे जावून विज्ञानवादी धम्म अंगीकार केल्याने प्रगती झाली.त्याचप्रमाणे जर जगाला प्रगतीकडे व मानवतेकडे जायचे सेल तर बुध्दांच्या विज्ञानवादी विचारा शिवाय पर्याय नाही से विचार बहुजन महाआघाडीचे संस्थापक ध्यक्ष सुरेशदादा गायकवाड यांनी पंधराव्या धम्म परीषदत बोलतांना व्यक्त केले.
डॉ. भदन्त कौसल्यायन महाविहार, सयाजी गायकवाड नगर देगाव (ता.नायगाव जि.नांदेड )येथे पंधरा वी बौद्ध धम्म परीषद संपन्न झाली.त्या परिषदेचे उदघाटन सुरेशदादा गायकवाड (संस्थापक आध्यक्ष, बहुजन महाआघाडी) यांच्या हस्ते करण्यात आले.पुढे गायकवाड म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचारापासून मात्र लांब आहोत. रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी लढवल्यास त्याला बोटावर मोजण्या ईतके मते मिळतात.निवडणुकामध्ये आपली हक्काची मते जातात कुठे हे कळायला मार्ग नाही. म्हणून समाजांने आता राजकीय दृष्ट्या सुध्दा डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना स्विकारले पाहिजे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमचे आध्यक्ष आमदार वसंतराव चव्हाण यांची उपस्थिती होती.यावेळी प्रा.यादव गायकवाड, प्रा.बलभिम वाघमारे ,मनोहर पवार,प्रा.केशव पवार,देविदास मनोहरे,पि.एस.गवळे,जे.डी.कवडे,रविभाऊ गायकवाड ,विठ्ठल गायकवाड,दत्ताहरी धोत्तरे, भास्कर भेदेकर, आशोकराव कांबळे,स्वप्निल नरबाग,शिलरत्न चावरे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक राहुल गायकवाड यांनी केले तर सुत्रसंचलन पि.एस.गवळे यांनी केले.आयोजनासाठी संयोजक राहुल गायकवाड,अविनाश गायकवाड ,विठ्ठल गायकवाड,राम वाघमारे,आनिल गायकवाड ,अंकुश गायकवाड,सचिन गायकवाड,राष्ट्रपाल हानमंते,अमोल गायकवाड आदींनी प्रयत्न केले.