जुनी पेन्शन बाबत दुटप्पी भूमिका:अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे घुमजाव

0
11

गोंदिया,दि.६ : सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे,आ दत्तात्रय सावंत, आ कपिल पाटील,आ अनिल सोले, आ ना गो गाणार यांनी ३८८९८ क्रमांकाच्या विचारलेल्या तारांकित प्रश्नाला मा वित्तमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरावरून हे स्पष्ट केले की कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करता येणार नाही.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच २४ जून २०१२ रोजी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असतांना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून जुन्या पेन्शन ची मागणी केली होती. तसेच संघटनेला मिळालेल्या माहिती अधिकारातून पत्रात विधानसभा व विधानपरिषदेत जुनी पेन्शन बंद करून नवीन पेन्शन लागू करण्याचा कोणताही मुद्दा मांडलेले नाही त्यामुळे चर्चा करण्याचा प्रश्नच नाही अशी माहिती मिळालेली आहे या घटनेचा जुनी पेन्शन हक्क संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केले आहे.
यावर संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, आशुतोष चौधरी,संदिप सोमवंशी,आशिष रामटेके,सचिन राठोड,प्रवीण सरगर,मुकेश रहांगडाले,राज कडव,जितु गणवीर,सुभाष सोनवाने,महेंद्र चौहान,भूषण लोहारे,सचिन धोपेकर,शीतल कनपटे,संतोष रहांगडाले,जीवन म्हशखेत्री,सुनिल राठोड व सर्व सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला अशी माहिती राज्यप्रशिद्धीप्रमुख संदिप सोमवंशी यांनी दिली.

मृत कर्मचारी यांच्या कुटुंबीयाच्या भावनेशी खेळ:-
१ नोव्हें २००५ नंतर मृत कर्मचारी यांच्या कुटुंबियांना कोणतेही लाभ मिळत नाही यावर उत्तर देताना केंद्राच्या धर्तीवर योजना आहे असा उल्लेख आहे.केंद्र सरकारने ५ मे २००९ ला मृत कर्मचारी यांच्या कुटुंबियांना फमिली पेन्शन लागू करण्याचा शासन निर्णय काढला असून त्याची अंमलबजावणी राज्याने केली नाही.