राष्ट्रवादीचा अर्जुनी मोरगावात हल्लाबोल

0
37
गोंदिया,दि.०६: राष्ट्रवादी काँंग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापूरे यांच्या नेतृत्वात अर्जुनी मोरगाव तालुक्यात सुरू असलेल्या शेतकरी सन्मान दींडीचा समारोप आज ६ मार्च रोजी तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून झाला. या हल्लाबोल आंदोलनात तालुक्यातील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्र्यांनी रस्त्यावर उतरून भाजपा सरकारच्या धोरणांचा विरोध केला.
१६ फेबुवारीपासून  राष्ट्रवादी काँंग्रेस पक्षाच्यावतीने शेतकरी सन्मान दिंडी राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष मनोहरराव चंद्रिकापूरे काढण्यात आली होती. या दींडीदरम्यान, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणाची माहिती शेतकरी व नागरिकांपर्यंत पोहोचविली व जनजागृतीचे काम केले. दरम्यान आज मंगळवारी या दींडीचा समारोप  हल्लाबोल आंदोलनाने  करण्यात आला. आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यांनी भाजपाविरोधी घोषणाबाजी केंद्र व राज्य शासनाच्या धिक्कार केला. या आंदोलनामुळे अर्जुनी मोरगाव येथे काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. त्यानंतर  संपूर्ण  अर्जुनी मोरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, शासनाने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकèयांना मिळाला नसल्याने सर्व शेतकèयांची पिक कर्ज व मध्यम मुदती कर्ज सरसकट माफ करणे, धान उत्पादक शेतकक्तयांना ५०० रु. प्रती बोनस देणे, प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा शेतकèयाना तातडीने लाभ देणे, धान उत्पादक शेतकèयांना उत्पादक खर्चाच्या दीड पट भाव देणे, शेतकèयांच्या शेतातील कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाच्या बाबतीत शासनाने जाहीर केलेली मुख्यमंत्री संजिवनी योजना ही शेतकèयांची फसवणूक करणारी असल्याने शेतकèयांच्या कृषी पंपाचे विद्युत बील सरसकट माफ करणे, तलाठ्यांनी शेतकèयांना, शेतमजुरांना व विद्याथ्र्यांना विविध प्रकारचे लागणारे दाखले देणे बंद केल्याने ग्रामीण भागातील होत असलेली लोकांची अडचण लक्षात घेवून तलाठ्यांना देण्याबाबतचे आदेश देणे, दुष्काळामुळे ढिवर समाजाच्या मच्छीमार सहकारी संस्थाचे नुकसान झाल्याने त्या सहकारी संस्थांना आर्थिक मदत देणे, ज्या शेतकèयांनी शेतामध्ये पावसाअभावी धानाची लागवड केली नाही त्या पडीत जमिनीचे सर्वेक्षण करून त्यांचा मशागतीचा खर्च व धानाच्या उत्पादनापासून वंचित राहिले तो खर्च तातडीने देणे, किडीच्या प्रादूर्भावामुळे ज्या शेतकक्तयांचे नुकसान झाले त्या शेतकक्तयांना तातडीने नुकसान भरपाई देणे आदी मागण्याचे निवेदन तसहिलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे माजी आ. राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, मनोहर चंद्रीकापुरे, राजलक्ष्मी तुरकर,गंगाधर परशुरामकर, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, योगेश नाकाडे, सुधीर साधवानी,राकेश लंजे यांनी केले. तर आंदोलनात तालुकाध्यक्ष डॉ.अविनाश काशीवार, गजानन परशुरामकर, जनार्धन काळसर्पे, चित्ररेखा मिश्रा,उद्धव मेहंदळे,मुन्ना पालीवाल, सौ.चंद्रिकापूरे, नामदेव डोंगरवार, बंडू भेंडारकर, जीवन लंजे, यशवंत परशुरामकर जि.प.सदस्य रमेश चुèहे, लक्ष्मण लंजे आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.