आज जागतिक महिला दिनानिमित्त अर्धनारेश्वरालय हलबीटोला येथे महिला मेळावा

0
12

गोंदिया,दि.७ : ग्रामीण भागातील बचतगटातील महिलांना वैयक्तीकरित्या उद्योग व्यवसायातून स्वावलंबी होता यावे यासाठी जिल्ह्यातील मागास, नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यातील महिलांसाठी  तहसिल कार्यालय सालेकसा, जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया व सहारा लोकसंचालीत साधन केंद्र सालेकसाच्या वतीने यांच्या संयुक्त वतीने आज ८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सालेकसा तालुक्यातील अर्धनारेश्वरालय हलबीटोला येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन आमदार संजय पुराम हे करतील. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती लता दोनोडे, पं.स.सभापती श्रीमती अर्चना राऊत, पं.स.उपसभापती दिलीप वाघमारे, सालेकसा नगराध्यक्ष विरेंद्र उईके,  श्रीमती सविता पुराम, जि.प.सदस्य देवराज वडगाये, श्रीमती दुर्गा तिराले, विजय टेकाम, पं.स.सदस्य हिरालाल फाफनवाडे, श्रीमती राजकुमारी विश्वकर्मा, श्रीमती प्रतिभा परिहार, श्रीमती जया डोये, श्रीमती प्रमिला दशरीया हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसिलदार प्रशांत सांगळे, जिल्हा अग्रणी प्रबंधक दिलीप सिल्हारे, नाबार्डचे सहायक महाप्रबंधक निरज जागरे, खंड विकास अधिकारी अशोक खाडे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर, महिला आयोगाच्या जिल्हा समन्वयक रजनी रामटेके, स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे आनंद वासनिक हे उपस्थित राहणार आहेत.तरी या मेळाव्यास सालेकसा तालुक्यातील बचतगटातील महिला, युवक व युवतींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व तहसिलदार प्रशांत सांगळे यांनी केले आहे.