मुख्य बातम्या:
बुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी

सैनिकी विद्यालय प्रवेशपूर्व चाचणी परीक्षेचे आयोजन

रविवारी  एकाचवेळी चार केंद्रावर होणार परीक्षा
बिलोली/नांदेड (सय्यद रियाज ),दि.८ः- बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील राजर्षी श्री छत्रपती शाहू सैनिकी विद्यालयाच्या सन २०१८ या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता पाचवी, सहावी ते दहावीकरिता रिक्त जागेच्या उपलब्धतेनुसार प्रवेशासाठी रविवार (दि.११) मार्च रोजी दुपारी १२ वाजता नांदेड, मुखेड, किनवट व हदगाव येथील परीक्षा केंद्रावर प्रवेशपूर्व चाचणी परीक्षेचे आयोजन केले आहे.
सगरोळी (ता.बिलोली) येथील सैनिकी विद्यालय मागील बावीस वर्षांपासून कार्यान्वित आहे. अल्पावधीतच जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यालयाने आपले नाव लौकिक केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये एकसंघ भावना, शिस्त व नेतृत्वगुणांचा विकास करून आत्मविश्वासपूर्ण समृद्ध राष्ट्रीय व्यक्तिमत्व विकसित करणे, विद्द्यार्थ्यामध्ये राष्ट्रप्रेमाची आवड निर्माण करणे, सैनिकी शिक्षणाला प्रोहोत्सान देणे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए.) प्रवेश परीक्षेची तयारी करणे याशिवाय बारावी नंतर वैद्यकीय, तंत्र व अन्य समकक्ष स्पर्धा परीक्षेत पात्र ठरण्याच्या दृष्टीने तयारी करून घेतली जाते. हॉर्स रायडींग, स्विमिंग, फायरिंग व विविध क्रीडा प्रकारचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांची आवड व गुणांचे परीक्षणाअंती आवर्जून विविध उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी होण्याकरिता प्रवृत्त केले जाते. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन व विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर आपले प्रतिनिधित्व सिद्ध केले आहे.
पुढील  शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाकरिता सायन्स कॉलेज नांदेड, गुरुदेव विद्यामंदिर मुखेड, कॉस्मोपॉलिटन हायस्कूल किनवट येथे रविवार (दि.११) मार्च रोजी दुपारी १२ वाजता तर या परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी रविवार (दि.18) एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सैनिकी विद्यालय सगरोळी (ता. बिलोली) येथे प्रवेश पूर्व चाचणी परीक्षेचे आयोजन केले आहे. इयत्ता पाचवीसाठी मर्यादित ४५ जागा असून इयत्ता पाचवी  व इयत्ता सहावी ते दहावीकरिता  रिक्त जागेच्या उपलब्धतेनुसार प्रवेशासाठी प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे.  हि परीक्षा १०० गुणांची व दोन तास कालावधीची असून भाषा, गणित, विज्ञान, बुद्धिमापन व सामान्यज्ञान यावर आधारित असणार आहे. परीक्षा प्रवेशशुल्क २५०/- असून आवेदनपात्र व माहिती पुस्तिका परीक्षा केंद्रावरच उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी सोबत दोन पासपोर्ट फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा असे आवाहन सैनिकी विद्यालयाचे कमांडंट राजेन्द्रप्रसाद मोहतो व प्राचार्य व्यंकट कुलकर्णी यांनी केले आहे.
Share