मुख्य बातम्या:
दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम# #युवा भोयर-पवार मंच वार्षिक महोत्सव उत्साहात# #अंबाझरी टी पॉइंटजवळ भीषण अपघात, दुचाकीवरच्या तिघींचा मृत्यू# #विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची बदली# #गोवारी समाजाला ST आरक्षण मिळणार; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल# #राज्यात ६१५ नक्षल्यांचे आत्मसमर्पण# #प्रधानमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन,राज्यघटना जाळल्याचा निषेध# #जुनी पेन्शन हक्क संघटन बनतय डीसीपीएस धारक कुटुंबीयांचा आधार# #सिमावर्ती प्रश्नाबाबत लवकरच खा.चव्हाण यांना आराखडा सादर करणार# #दुर्गामंदीर चप्राड (पहाडी) येथे दरोडा

लेंडारी परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन

चंद्रपूर,दि.09 : येथून जवळच असलेल्या लेंडारी शिवारात काम करीत असणाऱ्या दोन शेतकऱ्यांना अचानक पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. दरम्यान वाघाने या दोघांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता लाठ्याकाठ्या काढून आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला. ही घटना आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.
गोपाल थेरकर व सुरेश शेंडे अशी या शेतकऱ्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे, चिखलगाव – गिरगाव मार्गावरील नाल्याजवळ दोन दिवसांपूर्वी दोन बछड्यासह वाघिणीने दर्शन दिले होते. नागरिकांची गर्दी उसळल्यानंतर वाघीण एका बछड्याला घेऊन पळून गेली. मात्र एक बछडा नाल्याजवळच होता. वनविभागाचे कर्मचारी व पोलीस त्या बछड्यावर पाळत ठेवून असतानाच तो रात्रीच्या सुमारास नाल्याजवळून गायब झाला. त्यामुळे या वाघिणीचा व बछड्याचा वन कर्मचाऱ्यांनी शोध सुरू केला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी गोपाल थेरकर व त्याचे सहकारी सुरेश शेंडे यांना लेंडारी परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन झाले.

Share