पिंडकेपार येथे नाला सरळीकरणा कामाचे सभापती श्रीमती सोनवनेच्या हस्ते भूमिपूजन

0
20
गोंदिया,दि.१०-तालुक्यातील पिडंकेपार ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नाला सरळीकरण कामाचे भूमिपूजन गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा कमलेश सोनवाने यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्या दिप्ती चंद्रिकापूरे,सरपंच सुधीर चंद्रिकापूरे,उपसरंपच राजेश कोल्हे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामसेवक आणि गावकरी उपस्थित होते.सुमारे २२ लाख रुपयाच्या निधीतून नाला सरळीकरणाचे काम होणार असून भविष्यातही मतदारसंघाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजाताई सोनवणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले.यावेळी कामावर उपस्थित महिला पुरुष कामगारासंह गावकरी उपस्थित होते.