मुख्य बातम्या:

अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघाचा गजभियेनी घेतला आढावा

अर्जुनी मोरगाव,दि.12 :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु.जाती विभाग उपसमितीचे प्रमुख किशोर गजभिये,माजी आमदार बंडूभाऊ सावरबांधे,माजी जि.प.अध्यक्ष के.आर.शेंडे यांच्या उपस्थितीत अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार क्षेत्रातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी पक्षबळकटीकरणावर चर्चा करण्यात आली.अर्जुनी मोरगाव व गोरेगाव येथे या बैठका घेण्यात आल्या.त्याबैठकित येत्या निवडणुकीत आपला उमेदवार कसा निवडून येणार यावर विचारमंथन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, माजी सभापती पी.जी.कटरे, राजेश नंदागवळी,डाॅ. झामसिंगजी बघेले,नामदेवराव किरसान,महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, शेषरावजी गि-हेपूंजे,भागवतजी नाकाडे,अनिल राजगिरे,डेमेंद्र रहांगडाले, विशाल शेंडे,शशी भगत,मनोज वालदे,ऊमा बहेकार,मलेशाम येरोला,ज्योतीताई वालदे,ललिताताई बहेकार आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

Share