मुख्य बातम्या:

78 प्रवाशांसह नेपाळच्या विमानतळाजवळ कोसळले विमान

काठमांडू(वृत्तसंस्था) – नेपाळची राजधानी काठमांडू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मोठा विमान अपघात घडला. US-Bangla या बांग्लादेशी एअरलाइन्स कंपनीचे विमान 78 प्रवासी घेऊन येत होते. त्याचवेळी हा अपघात घडला आहे. घटनास्थळी अग्नीशमन आणि बचाव पथक दाखल झाली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. विमानतळ प्रशासनाने मोठ्या जिवीतहानीची भिती व्यक्त केली आहे.

काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुपारी 2.30 च्या सुमारास हा अपघात घडला आहे. काठमांडू प्रशासनाने या अपघातात अनेक जण जखमी असल्याचे प्राथमिक वृत्त दिले आहे. मृतांचीही शक्यता वर्तवण्यात आली. पण, आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, यात 20 जणांना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच किमान 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

विमानतळ प्रशासनाने अद्याप अपघाताचे अधिकृत कारण जाहीर केली नाही. तरीही स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, हे विमान त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ (काठमांडू) च्या धावपट्टीवर उतरत असताना अचानक त्याचे संतुलन बिघडले. तसेच विमान रनवेच्या पूर्वेकडे घसरून क्रॅश झाले. विमानात 71 प्रवासी आणि क्रू असे 78 जण होते. पण, विमानाची अवस्था पाहता त्यांच्या जिवाची चिंता व्यक्त केली जात आहे.

Share