योजनांच्या प्रचारयात्रेला नागरिकांचा उत्सफूर्त प्रतिसाद

0
7

तांडा येथे हजारो नागरिकांनी घेतली शासनाच्या योजनांची माहिती
गोंदिया,दि.12- भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव अ‍ॅड. विरेंद्र जायस्वाल यांच्या नेतृत्वात निघालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनाच्या प्रचारयात्रेच्या १८ व्या दिवशी तांडा येथे उत्स्पूâर्त प्रतिसाद मिळाला असून हजारो नागरिकांना या प्रचारयात्रेचे स्वागत करून शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली.
यावेळी झालेल्या प्रचारसभेच्या अध्यक्षस्थानी तांडाचे सरपंच मुकेश रहांगडाले हे होते. तर यावेळी यात्रेचे संयोजक शंभूशरणसिंग, उपसरपंच चेतसिंग परिहार,खेमराज पुंâडे,मुलचंद बिसेन, सुभाष डहाटकर, ओमचंद रहांगडाले,सुरेंद्रसिंह परिहार, तेजराम गौतम, भोजराम कटरे, मदन पटले, महादेव हरिणखेडे, सोमलाल हरवंâडे,नामेश्वर ठावूâर, वैâलाशसिंह चावडे, व अन्य उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अ‍ॅड.विरेंद्र जायस्वाल म्हणाले, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील दोन लाखापेक्षा अधिक महिला आमच्या अभियानाशी जुळल्या असून महिला कर्जमुक्ती अभियानामार्पâत आता दोन लाखावर पुरूषसुद्धा आमच्याशी जुळले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जनहितकारी योजनांची माहिती नागरिकांना व्हावी व नागरिकांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा. याकरीता ही यात्रा काढण्यात आली असून भाजपा सरकार दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी,शेतमजूर,कामगार, महिलांच्यासोबत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंभूशरणसिंग यांनी केले. तर आभार ग्रामरोजगार सेवक ओमचंद रहांगडाले यांनी केले. कायक्रमाला शेकडो नागरिकांनी हजेरी लावली होती.