भाजपा कार्यकर्त्यांची माजी जि.प.सभापतींना गावबंदीची धमकी

0
10

पत्रकार परिषदेत छाया दसरे व आत्माराम दसरे यांचा आरोप

गोंदिया,दि.12- जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागात विविध योजनांअतंर्गत करण्यात आलेल्या साहित्य खरेदी व पुरवठ्यात झालेली अनियमिततेत एक कोटी रूपयाचा भ्रष्टाचार उघडकीस आणल्यानंतर आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रातील विकासकामांची पाहणी करीत असताना एका रस्ता बांधकामात राजशिष्टाचाराला डावलून लावलेल्या फलकाविरूद्ध तक्रार केली होती. त्या तक्रारीच्याआधारे माझी पत्नी  माजी जि.प.सभापती छाया दसरे यांना दवनीवाडा येथे येवू देणार नाही, तुम्हाला गावबंदी केली आहे. आणि तुम्ही आलेही तर त्यावेळी जर काही अनुचित घटना घडली. तर त्याला जबाबदार मी राहणार नाही, अशा धमकीवजा इशारा भाजपा कार्यकर्ता निरज सोनवाने यांनी दिल्याचा आरोप आज १२ मार्च रोजी आत्माराम दसरे यांनी स्थानिक विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.सोबतच सोनवाने यांच्याशी भ्रमणध्वनीवर झालेला संवादही एैकविला.

यासंदर्भात रामनगर पोलिस ठाण्यात आज सोमवारी तक्रार दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. या तक्रारीत मी व माझी पत्नी छाया दसरे घरी चर्चा करीत असताना रविवारच्या सायंकाळी ८.०५ वाजता निरज सोनवाने यांनी भ्रमणध्वनीवरून गावबंदी केल्याचे सांगितले. तसेच दमदाटीच्या भाषेत छायाताई दसरेंच्या हातून माईक हिसकवणार, त्या आल्यास तर परिस्थिती बिघडणार व काहीच होऊ शकणार अशी धमकीवजा निरोप दिल्याचा उल्लेख केला आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे व कृषी अधिकारी निमजे यांच्या संगनमताने देवरी व सालेकसा येथे साहित्य खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला.

जि.प. सदस्य व माजी सभापती दसरे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे गंगाझरी-खातिटोला-दवनीवाडा या मार्गाचे बांधकाम करण्यात येत आहे.हा क्षेत्र जिप सदस्य छाया दसरे यांचे असून या रस्त्याच्या बांधकामासाठी संबंधित विभागाकडून रतनारा (खातिटोला) येथे ९ फेब्रुवारी रोजी भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर भूमिपूजक म्हणून तिरोडा-गोरेगाव विधान सभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले होते. दरम्यान, राजशिष्टाचाराच्या नियमाप्रमाणे संबंधित क्षेत्राच्या जिप सदस्याला कार्यक्रमात निमंत्रित करणे बंधनकारक आहे. असे असताना कार्यक्रमात श्रीमती दसरे यांना निमंत्रितच करण्यात आले नाही. उलट भूमिपूजन कार्यक्रमाच्या माहितीचे त्याठिकाणी फलक लावण्यात आले असता लावण्यात आलेल्या फलकातही पदाधिकाNयांचे नाव व पद यांच्यात चुका करण्यात आल्या. पंचायत समिती सदस्यांना जिल्हा परिषद सदस्य दाखविण्यात आले. फलकावर भूमिपूजक म्हणून आ. विजय रहांगडाले यांचे नाव व पद देण्यात आले असतानाच पं.स. सदस्य हितेंद्र (गुड्डू) लिल्हारे यांचेही नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हितेंद्र लिल्हारे हे पं. स. सदस्य असताना फलकावर त्यांच्या नावासमोर जिप सदस्य असे पद लिहीण्यात आले आहे. त्यामुळे संबधित अधिकाNयांनी स्वत:च्या मर्जीनेच श्रीमती दसरे यांचे पद पं. स. सदस्य लिल्हारे यांना दिल्याच्या आरोप करून देवरी येथील कृषी विभागाच्या योजनांमध्ये टीएसपी,ओटीएसपी,पुुरवठा केलेले साहित्य अनधिकृतरित्या खरेदी करण्यात आले असून यात एक कोटी रूपयाचा भ्रष्ट्राचार झाला असून सदर पुरवठ्याची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी माजी जि.प.कृषी व पशुसंवर्धन छाया दसरे यांनी केली असून याप्रकरणी पालकमंत्री ना.बडोले,मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय आयुक्तांकडे केल्याची माहितीही त्यांनी पत्रपरिषेदत दिली.