मुख्य बातम्या:

शेतकऱ्यांना माओवादी संबोधणे ही तर ‘मनु’वृत्ती!

मुंबई,दि.13(विशेष प्रतिनिधी) : आदिवासी शेतक-यांना ‘नक्षलवादी’, ‘माओवादी’ म्हणणे ही अतिशय निषेधार्थ असून, यातून भाजपाचे मनुवादी स्वरूप समोर आले आहे. भाजपाच्या पोटात काय आहे, हे या निमित्ताने शेतकºयांना कळले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली.
भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा पूनम महाजन यांनी किसान लाँग मार्चमधील शेतकºयांना ‘नक्षलवादी’, ‘माओवादी’ अशा स्वरूपाचे शब्द वापरले असल्याचे कळताच, जयंत पाटील यांनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. महाजन यांनी जे वक्तव्य केले, ते मनुवादी वृत्तीचे उत्तम उदाहरण आहे. १८० किमीचा प्रवास करून ते शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी मुंबईत पोहोचले आहेत, परंतु महाजन यांनी या लढ्याला शहरी नक्षलवादी आणि माओवादी असे रंग देणे हे स्पष्ट करते की, भाजपाची शेतकºयांप्रती काय आस्था आहे. शेतकºयांबाबत यांच्या मनात किती द्वेषभावना आहे, हे यातून स्पष्ट होते, असे पाटील म्हणाले.

Share