मुख्य बातम्या:
बुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी

१७ मार्च रोजी ओबीसी हुंकार परिषद नागपूरात

नागपूर,दि.१३: राष्ट्रीय ओबीसी महासंघाअंतर्गत येत असलेल्या दक्षिण-पूर्व नागपूर शहर शाखेच्यावतीने १७ मार्च शनिवारला रात्री ८ वाजता ओबीसी हुंकार परिषदेचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीम बाग नागपूर येथे करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन गुजरातचे युवा ओबीसी नेते आमदार अल्पेश ठाकोर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. बबनराय तायवाडे राहणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून निर्मल बँकेचे संस्थापक प्रमोद मानमोडे उपस्थित राहणार आहेत. या हुंकार परिषदेला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक डॉ. खुशालचंद्र बोपचे, प्रमुख वक्ते म्हणून जावेद पाशा, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे, अरुण पवार, डॉ. गिरीश पांडव आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या हुंकार परिषदेला अधिकाधिक संख्येने ओबीसींनी उपस्थित रहावे असे आवाहन नागपूर शहर अध्यक्ष संजय पन्नासे, कार्याध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रा. संज़य चौधरी, मोतीलााल चौधरी, नान ालोखंडे, नितीन देशमुख, संज़य चकोले, उदय देवकर, अताउल्ला खान, विजय पटले, आकाश जावळे, गोqवद वरवाडे, प्रफुल ठाकरे, आरीफ अंसारी, काशीराम यादव, राजू ढेंगे, भैय्या रडके, मंगेश वाघ, जयकुमार क्षीरसागर, अमोल वाकूडकर,निशांत डुंबरे, आqदी केले आहे.

Share