मुख्य बातम्या:
पंचायत समिती कार्यालयावरीव तिरंग्याजवळच आत्मदहनाचा प्रयत्न# #जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द- पालकमंत्री बडोले# #वाशिम जिल्ह्यात ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ# #शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी- पालकमंत्री संजय राठोड# #क्षत्रिय पोवार समाज संघ पुणेद्वारा व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम १६ सितंबर को# #दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम# #युवा भोयर-पवार मंच वार्षिक महोत्सव उत्साहात# #अंबाझरी टी पॉइंटजवळ भीषण अपघात, दुचाकीवरच्या तिघींचा मृत्यू# #विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची बदली# #गोवारी समाजाला ST आरक्षण मिळणार; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

MPSC च्या भोंगळ कारभाराविरोधात मुंबईत ‘आक्रोश’

मुंबई,दि.13- स्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात मुंबईत आज राज्यभरातील विद्यार्थ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. यावेळी हजारो विद्यार्थी सहभागी झाले. महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघर्ष समितीच्या या मोर्चाचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यंदा केवळ 69 उमेदवारांची भरती करण्यात येणार असल्याची जाहिरात काढली होती. त्यानंतर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. राज्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने सरकारने मागील काही वर्षात अनेक रिक्त पदे भरली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांत दिवसेंदिवस नाराजी वाढत चालली होती. त्यातच अधिकारी भरती करताना डमी उमेदवार बसवून हजारो ढं विद्यार्थी क्लास वन अधिकारी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकत्र सरकारविरोधात आक्रोश मोर्चा काढला आहे. यापूर्वी पुणे, औरंगाबाद येथे एमपीएससी करणा-या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले होते. आता या मोर्चाला राज्यस्तरीय स्वरूप आले असून, विविध पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

Share