मुख्य बातम्या:
बुद्ध भूमि उमरी कटंगी में हुआ अंतरराष्ट्रीय बौद्ध मैत्री सम्मेलन# #अजीत जोगी नहीं लड़ेंगे चुनाव# #गडचिरोलीतील गोवारी समाज आंदोलनाला खा.नेतेंची भेट# #बेशिस्त वाहन पार्किंगवर होणार कारवाई निवारण कक्षाला माहिती देण्याचे आवाहन# #अवैैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने उडवले शेतकऱ्याला# #न्यायालयाच्या निर्णयाची अमंलबजावणी करा- गोवारी समाजाची मागणी# #अवैध लोहखनीज उत्खनन विरुद्ध वनविभागाची कार्यवाही तीन ट्रक जप्त# #बालवाडी कर्मचारीओंका 20 अक्तूंबर को सम्मेलंन# #अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट शनिवार व रविवारला गोंदियात# #पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला, 7 जवान जखमी

सुकमा भागात नक्षली हल्ल्यात 9 जवान शहीद, सहा जखमी

सुकमा/रायपूर(वृत्तसंस्था),दि.13- नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव दलाचे (सीआरपीएफ) 9 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात सहा जवान गंभीर जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.सूत्रांनुसार, सुकमा जिल्ह्यातील किस्टाराम कॅंममधून सोमवारी सकाळी साडे सात वाजता 212 बटालियनचे सीआरपीएफचे जवान पेट्रोलिंगसाठी निघाले होते. या भागात नक्षलींनी आधीच आयईडी बॉम्ब पेरुन ठेवले होते. दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर अचानक अंदाधूंद गोळीबार करत आयईडी स्फोट घडवून आणला. जवळपास 150 नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे. नक्षली आणि जवानांमध्ये चकमक सुरु आहे.

सुकमा येथे नक्षली हल्ल्यांमध्ये CRPFचे 9 जवान शहीद झाले आहेत. तर अनेकजण जखमी असण्याची शक्यता आहे.  मृत्यूचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. रात्री जगंलात गस्त घालत असताना नक्षलींनी आयईडी स्फोटकांच्या साहाय्यानं CRPFच्या 212 बटालियनजवळ आधी भू-सुरुंग स्फोट घडवून आणला व नंतर बेछूट गोळीबार केला.  स्पेशल डीजी नक्सल ऑपरेशन डीएम अवस्थी यांनी सांगितले की, ”सीआरपीएफ  जवान एंटी लैंडमाइन वाहनाने किस्टाराम  वरुन पैलोडी ला जात होते। ”यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहेत. या हल्ल्यात 10 जवान जखमी झाले असून त्यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळावर पर रेस्क्यू  करीता लिए फोर्स  पोचल्याची माहिती दिली.

Share