मुख्य बातम्या:
राष्ट्रवादी काँग्रेसने खड्यात बेशमरची झाडे लावून केले आंदोलन# #आ.अग्रवालांनी कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाचे केले कौतुक# #कन्हैयाकुमार, प्रकाश राज रविवारी नागपुरात# #शुक्रवारपासून गडचिरोलीत कृषी व गोंडवन महोत्सव# #अकोल्यात जीर्ण इमारत कोसळल्याने एकाचा मृत्यू# #अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ गुरुवारला# #नक्षल्यांनी पेरून ठेवलेले विस्फोटक पोलिसांनी केले जप्त# #"प्रविण कोचे उत्कृष्ठ पोलीस पाटील पुरस्काराने सम्मानीत"# #अवैध रेतीवाहतूकीवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक# #परिवर्तन स्पेशल स्कूल (पीओ आरडीएसी)  सफदरजंग एन्क्लेव में बच्चों की स्पर्धा

मेहुण्यांनी केली भाऊजीची हत्या

गडचिरोली,दि.13- दोन मेहुण्यांनी मिळून भावोजीला धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील ही घटना आहे. बहीण-भावोजीमध्ये भांडण झाल्यानंतर बहिणीने कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. मात्र तिला पतीनंच मारल्याच्या संशयातून दोन मेहुण्यांनी त्याला मारहाण करत व चाकूने भोसकलं. धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व घटना रुग्णालय परिसरातच घडली.  मंगळवारी (13 मार्च) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास सिरोंचा येथे ही घटना घडली.

राजण्णा नामला (वय 32 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 8 वर्षांपूर्वी त्याचे संध्याराणी (वय 25 वर्ष)सोबत लग्न झाले होते. त्यांना दोन मुले होती. पण दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारासही त्यांच्यात भांडण झालं, मात्र यावेळी संध्याराणीनं घरातील कीटकनाशक पिऊन स्वतःचे आयुष्य संपवले. यानंतर तिला सिरोंचा येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी तिचे शवपरिक्षण सुरू असताना संध्याराणीचे दोन भाऊ आणि माहेरच्या काही लोकांची राजण्णासोबत रुग्णालयाच्या गेटवरच बाचाबाची झाली. यावेळी राग अनावर झालेल्या माहेरच्या लोकांनी राजण्णाला जबर मारहाण केली तर संतोष (30) व रमेश लखमय्या सोदारी (28) या भावंडांनी त्याला चाकूने भोसकले.

यात राजण्णाचा जागीच मृत्यू झाला. बहिणीच्या मृत्यूला राजण्णाच कारणीभूत असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली देत दोन्ही भावांनी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले. या घटनेमुळे राजण्णा व संध्याराणी यांच्या दोन्ही मुलांवरील आईवडिलांचे छत्र हिरावले गेले आहे.

Share